शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या खटला : तिसऱ्या न्यायमूर्तींनाही लाभाचे पद, बनले राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 10:56 IST

सुरेश भुसारी लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : २०१९ मध्ये दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक अयोध्या खटल्याचा निर्णय देणाऱ्या ...

सुरेश भुसारीलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २०१९ मध्ये दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक अयोध्या खटल्याचा निर्णय देणाऱ्या पाच न्यायाधीशांपैकी तिघांना केंद्र सरकारने आतापर्यंत लाभाच्या पदावर नियुक्त केले आहे. या पाच सदस्यीय खंडपीठात असलेले अब्दुल नझीर गेल्या महिन्यात सेवानिवृत्त झाल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात त्यांना राज्यपालपद बहाल करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्येतील  रामजन्मभूमी न्यासाच्या खटल्याचा निकाल ९ नोव्हेंबर २०१९ मध्ये लागला. यात केंद्र सरकारने तयार केलेल्या ट्रस्टला २.७७ एकर  जागा देण्याचा ऐतिहासिक निर्णय तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिला. या खंडपीठात न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण व न्या. अब्दुल नझीर यांचा समावेश होता. हा निर्णय दिल्यानंतर रंजन गोगोई १७ नोव्हेंबर २०१९ ला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर चार महिन्यांनी १६ मार्च २०२० मध्ये त्यांची राज्यसभेचे सदस्य म्हणून राष्ट्रपतींनी नियुक्ती केली.

अशोक भूषण व अब्दुल नझीर यांची नियुक्ती...या खंडपीठातील न्या. अशोक भूषण गेल्या जुलै २०२१ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांचीही चार महिन्यांनंतर राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. आता याच खंडपीठात समाविष्ट असलेले अब्दुल नझीर गेल्या ४ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून  सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर एक महिन्यानंतरच त्यांची आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. 

कोण होते खंडपीठातया खंडपीठात माजी सरन्यायाधीश शरद बोबडेसुद्धा होते. ते २३ एप्रिल २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले. परंतु, त्यांची केंद्र सरकारने अद्याप तरी कोणत्याही उच्चपदावर नियुक्ती केलेली नाही. याच खंडपीठात डॉ. धनंजय चंद्रचूड यांचाही समावेश होता. ते सध्या देशाचे सरन्यायाधीश आहेत.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयRam Mandirराम मंदिर