शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Ayodhya Dispute: वादग्रस्त जमीनवगळता उर्वरित जागा रामजन्मभूमी न्यासाला द्या, केंद्राची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 11:35 IST

केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाकडे राम मंदिरासाठीची वादग्रस्त जमीन वगळता ऊर्वरित जमीन रामजन्मभूमी न्यासाला द्यावी, अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्दे केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाकडे राम मंदिरासाठीची वादग्रस्त जमीन वगळता ऊर्वरित जमीन रामजन्मभूमी न्यासाला द्यावी 67 एकर जमिनीचे केंद्र सरकारने अधिग्रहण केले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयानं त्या अधिग्रहणाला स्थगिती दिली होती. केंद्रानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत 67 एकरातील वादग्रस्त जमीन वगळता उर्वरित जमीन रामजन्मभूमी न्यासाला द्यावी, अशी मागणी केली

नवी दिल्ली- केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाकडे राम मंदिरासाठीची वादग्रस्त जमीन वगळता ऊर्वरित जमीन रामजन्मभूमी न्यासाला द्यावी, अशी मागणी केली आहे. केंद्रानं याचिका दाखल करत ही मागणी केली आहे. 67 एकर जमिनीचे केंद्र सरकारने अधिग्रहण केले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयानं त्या अधिग्रहणाला स्थगिती दिली होती. त्यातच आता केंद्रानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत 67 एकरातील वादग्रस्त जमीन वगळता उर्वरित जमीन रामजन्मभूमी न्यासाला द्यावी, अशी मागणी केली आहे.67 एकरातील 2.77 एकर वादग्रस्त जमीन चहूबाजूंनी पसरलेली आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या रामजन्मभूमी- बाबरी मशीद खटल्याची मंगळवारची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं रद्द केली आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठातील एक न्यायाधीश न्या. शरद बोबडे 29 जानेवारीला उपस्थित राहणार नसल्यामुळे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ 29 जानेवारीला या प्रकरणाची सुनावणी घेणार नसल्याचंही स्पष्ट केलं होतं.1993मध्ये केंद्र सरकारनं अयोध्या अधिग्रहण ऍक्टअंतर्गत वादग्रस्त जागा आणि जवळपासची जमीन अधिग्रहित केली होती. परंतु त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या. तसेच सरकारच्या या ऍक्टला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं 1994च्या इस्माइल फारुखी यांच्या अर्जावर ही जमीन केंद्राच्या हवाली केली होती आणि न्यायालयाचा निर्णय ज्याच्या बाजूनं जाईल, त्याला ती जमीन देण्याचे निर्देश केंद्राला दिले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाने अयोध्येतील 2.77 एकर जागा सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा व राम लल्ला यांना समसमान वाटून देण्यास 2010च्या निर्णयात सांगितले होते. त्यानंतर त्यावर 14 अपिले करण्यात आली होती. एकूण चार दिवाणी दाव्यांवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने जमीन सारखी वाटण्याचा निकाल दिला होता. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या