शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

आरे कारशेडच्या कामाला स्थगिती नाही: सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 06:12 IST

मुंबई मेट्रो-३ची कारशेड उभारण्यासाठी आरे दुग्ध वसाहतीमधील झाडे तोडण्याच्या बाबतीत आधी दिलेला ‘जैसे थे’ अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कायम ठेवला.

नवी दिल्ली : मुंबई मेट्रो-३ची कारशेड उभारण्यासाठी आरे दुग्ध वसाहतीमधील झाडे तोडण्याच्या बाबतीत आधी दिलेला ‘जैसेथे’ अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कायम ठेवला. मात्र त्या जागेवर कारशेड उभारणीच्या कामास कोणताही स्थगिती आदेश असणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे झाडे तोडून मोकळ््या झालेल्या जागेवर कारशेडचे काम सुरु ठेवण्यास मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळास कोणतीही आडकाठी आसणार नाही.

कारशेडसाठी आरेमधील झाडे तोडण्यास महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने दिलेल्या परवानगीविरुद्ध केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर काही पर्यावरणप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात अपिले केली आहेत. दुर्गापूजेच्या सुटीमध्येही अपिले ७ आॅक्टोबर रोजी सर्वप्रथम एका विशेष खंडपीठापुढे आली तोपर्यंत २,७०० झाडे तोडून झाली होती. जेवढी झाडे तोडायची होती तेवढी तोडून झाली आहेत, असे मेट्रो रेल्वे महामंडळाने सांगितल्यानंतर त्यादिवशी न्यायालयाने झाडांच्या बाबतीत ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिला होता.

किती नवी झाडे लावली?

ही अपिले सोमवारी पुढील सुनावणीसाठी न्या. अरुण मिश्रा व न्या. दीपक गुप्ता यांच्या नियमित खंडपीठापुढे आली तेव्हा मेट्रो रेल्वे महामंडळातर्फे ज्येष्ठ वकील मुकुल रोहटगी व महापालिकेतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, गेले दोन आठवडे ‘जैसे थे’ आदेशाचे कसोशीने पालन केले गेले आहे आणि एकही झाड तोडण्यात आलेले नाही. यावर, झाडे किती व कशी तोडली व त्याच्या बदल्यात नवी झाडे किती लावली आणि त्यांची स्थिती काय याची सर्व माहिती छायाचित्रांसह सादर करण्यास सांगून पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली गेली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAarey ColoneyआरेMetroमेट्रो