शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्त! हेलिकॉप्टमधून जाताना मुख्यमंत्र्यांनी पाहिला असा नजारा; व्हिडिओही शेअर केला, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 16:40 IST

कॉनराड संगमा यांनी जयंतिया हिल्समधील एका सुंदर धबधब्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

नवी दिल्ली- हिरवीगार झाडं, निर्मळ नद्या, उंच टेकड्या, सुंदर धबधबे, तलाव आणि जंगल...मेघालय राज्य निसर्गप्रेमींसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. राज्याचे सौंदर्य पाहण्यासाठी लोक लांबून येतात. येथील छायाचित्रे आणि व्हिडिओ अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतात. याचदरम्यान मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

कॉनराड संगमा यांनी जयंतिया हिल्समधील एका सुंदर धबधब्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच अनेकांना हा व्हिडिओ भुरळ देखील पाडत आहे. सदर व्हिडिओ शेअर करत संगमा म्हणाले की, जयंतिया हिल्सवरुन जात होतो. हा कोणता धबधबा आहे काही कल्पना?.. ही क्लिप आजूबाजूला झाडे-झाडांनी झाकलेल्या टेकड्यांमधून वाहणाऱ्या धबधब्याचे एक हवाई दृश्य आहे, जे पाहून लोक आश्चर्यचकित झाले. बहुतेक वापरकर्त्यांना ठिकाण शोधता आले नाही, परंतु काही लोकांनी कमेंट बॉक्समध्ये धबधब्याचे नाव लिहिले. नंतर त्यांच्या पोस्टला उत्तर देताना संगमा यांनी धबधब्याचं नाव उघड केलं.

लोकांनी प्रश्न विचारले-

मुख्यमंत्र्यांनी लिहिले, 'होय ते फि-फी फॉल आहे. ज्यांनी अचूक उत्तर दिले त्यांचे अभिनंदन. संगमा यांनी कालच हा व्हिडिओ शेअर केला असून आतापर्यंत या व्हिडिओला ८ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओतील दृश्याने युजर्संना आश्चर्यचकित केले. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. एका युजर्सने लिहिले की, 'वाह खूप सुंदर जागा. खूप छान सर. दुसर्‍या युजरने कमेंट केली, 'व्वा किती सुंदर धबधबा, किती प्रेक्षणीय दृष्य आहे.' तिसर्‍याने लिहिलं, 'फि फाई फॉल... दोनदा तिथे गेलो आणि इथे खूप आवडलं. मेघालय हे खरोखरच देवाने निवडलेले ठिकाण आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Natureनिसर्गSocial Viralसोशल व्हायरल