शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सत्येंद्र प्रकाश यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 06:25 IST

मतदारांत जागृतीसाठी केले उल्लेखनीय प्रयत्न

नवी दिल्ली : बीओसीचे प्रधान महासंचालक सत्येंद्र प्रकाश यांना आज वर्ष २०२१-२२ साठी मतदार जागरूकतेच्या दिशेने केलेल्या सक्रिय प्रयत्नांसाठी राष्ट्रीय पुरस्काराने येथे सन्मानित केल गेले. हा पुरस्कार निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त दिला जातो. राष्ट्रीय मतदार दिन २०२२ निमित्त आयोगाकडून सत्येंद्र प्रकाश यांना प्रमुख पाहुणे केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू, मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला गेला. कोविड-१९ च्या सध्याच्या आव्हानात्मक दिवसांत मतदानात जनतेचा सहभाग वाढावा, यासाठी त्यांना शिक्षित करून त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्यात सत्येंद्र प्रकाश यांच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान केला गेला आहे. 

कोविड-१९ मुळे लोकांशी थेट संवाद एक आव्हान बनले आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नवे मार्ग शोधून संवाद प्रभावी करण्यात सत्येंद्र प्रकाश यांचे योगदान खूप महत्त्वाचे ठरले आहे. उल्लेखनीय आहे की, अशाप्रकारच्या प्रयत्नांनी मतदारांच्या सहभागाची टक्केवारी वाढली आहे.प्रकाश यांच्या नेतृत्वात बीओसी आपल्या २३ क्षेत्रीय आऊटरीच ब्यूरो (आरओबी) आणि १४८ फिल्ड आऊटरीच ब्यूरोसह (एफओबी) नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहे. व्हाॅट्स-ॲप ग्रुप्स, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर ट्वीट्स/री-ट्वीट्स, एसएमएस, टेलिफोनिक कॉल्स आणि वेबिनारच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करण्याचे काम केले जात आहे. या सोशल मीडिया माध्यमांचा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचे साधन म्हणून वापर केला जात आहे. सत्येंद्र प्रकाश यांना यापूर्वी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार २०१८ मध्ये सर्वश्रेष्ठ वृत्तचित्र फिल्म निर्माता म्हणून ‘रजत कलम’ने सन्मानित केले गेले होते. 

टॅग्स :delhiदिल्लीVotingमतदान