शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
4
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
5
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
6
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
7
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
8
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
9
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
10
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
11
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
12
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
13
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
15
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
16
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
17
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
19
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
20
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम

एकदाच वापराच्या प्लास्टिकचा उपयोग टाळा - पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 03:33 IST

जनावरांचे लसीकरण : १२,६५२ कोटी रुपये खर्च करणार

मथुरा (उत्तर प्रदेश) : एकदाच वापरले जाईल अशा प्लास्टिकचा वापर लोकांनी टाळावा, असे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लास्टिकच्या अनिर्बंध वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून, त्यातून जनावरांचा आणि माशांचा मृत्यू घडला आहे, असेम्हटले.

‘स्वच्छता ही सेवा’ कार्यक्रमात बुधवारी येथे मोदी महिलांना कचऱ्यातून प्लास्टिक वेगळे काढण्यास मदत केल्यानंतर मार्गदर्शन करताना बोलत होते. कचºयातून प्लास्टिक वेगळे काढण्यासाठी मोदी हे महिलांसोबत जमिनीवर बसले होते. यातून एकदाच वापरात येणाºया प्लास्टिकचा वापर बंद करण्याच्या मोहिमेद्वारे परिणामकारक संदेश लोकांमध्ये गेला.

मोदी येथे एक दिवसाच्या दौºयावर आले असताना त्यांच्या हस्ते राष्ट्रीय प्राणी रोग नियंत्रण कार्यक्रमाचे उद््घाटन करण्यात आले. जनावरांना होणारे संसर्गजन्य आजार नष्ट करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. २०२४ पर्यंत या कार्यक्रमासाठी केंद्र सरकार १०० टक्के निधी देणार आहे.

१२ हजार ६५२ कोटी रुपये खर्चाच्या या कार्यक्रमाद्वारे ५०० दशलक्ष जनावरांचे (गुरेढोरे, मेंढ्या, शेळ्या, डुकरे) लसीकरण केले जाणार आहे. दरवर्षी या कार्यक्रमाद्वारे ३६ दशलक्ष गोवंश मादी वासरांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे. ही जनावरे संसर्गजन्य आजारांनी त्रस्त असतात व हे आजार जनावरांकडून मानवाला होतात.कचरावेचक २५ कामगारांशी संवादकार्यक्रमात २०२५ पर्यंत हे आजार नियंत्रणात ठेवण्याचे आणि २०३० पर्यंत त्यांना नष्ट करण्याचे टप्पे आहेत. या भेटीमध्ये मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ‘स्वच्छता ही सेवा’ कार्यक्रमाचा भाग म्हणून मोदी २५ कचरावेचक कामगारांना भेटले.महिलांनी तोंडावर मास्क लावलेले व हातमोजे घातलेले होते. घराघरांतून निर्माण होणारा कचरा आणि त्यात प्लास्टिकचे असणारे प्रमाण याबद्दल मोदी यांनी विचारलेल्या प्रश्नांना या कामगारांनी उत्तरे दिली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी