शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार लाख बेरोजगारांसाठी अवघे ९२३ रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 06:38 IST

गेल्या दीड वर्षांत अवघ्या अडीच हजार व्यक्तींनाच रोजगार

नवी दिल्ली : सूक्ष्म, लघू आणि मध्यम मंत्रालयाच्या (एमएसएमइ) वतीने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या संपर्क पोर्टलवर डिसेंबरअखेरीस तब्बल ४ लाख ६० हजार बेरोजगार व्यक्तींनी नोंदणी केली आहे. मात्र, त्या पैकी अवघ्या ९२३ जणांना रोजगार संधी उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर, गेल्या दीड वर्षांत अवघ्या अडीच हजार व्यक्तींनाच या पोर्टलद्वारे रोजगार उपलब्ध झाला आहे.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते जून २०१८मधे या पोर्टलची सुरुवात करण्यात आली होती. कंपन्या आणि काम शोधू इच्छिणाऱ्या व्यक्तींमध्ये संपर्काचा पूल या निमित्ताने बांधला गेला होता. बेरोजगार आणि शिक्षण घेत असलेल्या १८ वर्षे वयाच्या उमेदवारांना या पोर्टलवर नोंदणी करता येते. त्यावर आपल्या शैक्षणिक अर्हतेनुसार रोजगार मिळविण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आली. मात्र, डिसेंबरअखेरीस २ हजार ५२८ व्यक्तींना या पोर्टलद्वारे रोजगार मिळाला आहे. म्हणजेच महिना सरासरी दीडशेहून कमी व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे. या पोर्टलवर पाच हजारांहून अधिक कंपन्यांनी नोदणी केलेली आहे. मात्र, मोठे उद्योग अथवा संस्था, तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या त्यावर नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच तुलनेने कमी रोजगार उपलब्ध होत असल्याचे सूक्ष्म, लघू आणि मध्यम मंत्रालातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.