श्रीनगर - काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात जवाहर टनेल भागामध्ये पोलीस चौकीवर हिमस्खलन होऊन दहा पोलीस अडकले होते. दरम्यान, आज बर्फाखाली अडकलेल्यांपैकी सात जणांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये पाच पोलिसांचा समावेश आहे. मात्र एक पोलीस कर्मचारी अद्याप बेपत्ता आहे. तर दोन पोलिसांना बर्फाखालून सुखरूपरीत्या बाहेर काढण्यात आले होते. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
पोलीस चौकीवर हिमस्खलन : पाच पोलिसांसह 7 जणांचे मृतदेह सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 23:52 IST