शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

नॅकच्या मूल्यांकनानंतरच महाविद्यालयांना स्वायत्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 06:59 IST

पोखरीयाल यांचे स्पष्टीकरण; शैक्षणिक संस्थांना गुणवत्तावाढीची सक्ती

नवी दिल्ली : नव्या शैक्षणिक धोरणात सरसकट एका निर्णयाने शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता दिली जाणार नाही. टप्प्याटप्प्याने गुणवत्ताविकसन व त्यानंतर स्वायत्तता ही संकल्पना धोरणात आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करावेत, स्वायत्ततेसाठी नाही, अशा शब्दात केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी धोरणनिर्मितीची भूमिका मांडली.देशात ३५ हजार महाविद्यालयांपैकी ८ हजार स्वायत्त आहेत. प्रत्येक महाविद्यालय, शैक्षणिक संस्था (इज्युकेशनल इन्स्टिट्युटशन) गुणवत्ता वाढवून नॅकच्या स्पर्धेत उतरल्यावरच टप्प्याटप्प्याने स्वायत्तता मिळेल, असेही निशंक यांनी स्पष्ट केले. नव्या शैक्षणिक धोरणावर आयोजित वेबिनारमध्ये पहिल्यांदा पोखरीयाल यांनी जाहीर संवाद साधला. नॅक मूल्यांकनासाठी आवश्यक सारे बदल महाविद्यालयांना करावेच लागतील, यावरच पोखरीयाल यांनी शिक्कामोर्तब केले.पोखरीयाल म्हणाले, मातृभाषेतून शिक्षण म्हणजे इंग्रजीला किंवा कोणत्याही विदेशी भाषेला विरोध असे नाही. कोणत्याही विषयाचे आकलन मातृभाषेत सहजपणे होते. मातृभाषेचा आग्रह धरताना आम्ही देशभरातून तज्ज्ञांचे मत जाणून घेतले. ९९ टक्के लोकांनी या निर्णयाचे समर्थन केले. कोणताही विकसित देश घ्या, तेथे मातृभाषेतून शिक्षण घेवून लोकांचा विकास झाला. इंग्रजीकडे केवळ एक विषय (भाषा) म्हणूनच बघितले पाहिजे.गुणवत्ता उत्तम असलेली जागतिक विद्यापीठच भारतात येतील. जगात शिकायला गेलेले भारतीय विद्यार्थी मायदेशी परतण्याचे प्रमाण कमी. एक ते दीड लाख कोटी रुपये परदेशी शिक्षणावर दरवर्षी खर्च होतो. पैसा व प्रतिभा दोन्हींची गुंतवणूक देशाबाहेर. उत्तम गुणवत्ता असलेले शिक्षण भारतातच मिळेल, याची ग्वाही विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. परदेशी विद्यापीठ आपल्या अटींवर भारतात येतील. अभ्यासक्रम, शिक्षणपद्धती, शिक्षक भारताच्या गरजेनुसार असतील, परदेशी विद्यापीठांच्या नव्हे.काय म्हणाले पोखरीयाल?मुलांना मार्कांच्या रेसमध्ये गुंतवायचे नाही. आता रिपोर्ट कार्ड नव्हे तर प्रोग्रेस कार्ड असेल. विद्यार्थ्यांनाच स्वत:चे मूल्यांकन करता येईल. त्याचे शिक्षक, सोबत शिकणाऱ्यांचाही समावेश असेल.विद्यार्थी सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य असल्याने अद्याप शाळा उघडण्याचा निर्णय झाला नाही. सध्यातरी केवळ सुरक्षेची चाचपणी केली जात आहे. नजीकच्या काळात त्यासंदर्भात निर्णय होईल.संशोधनात आपण जगात मागे असल्याने राष्ट्रीय संशोधन परिषदेचा प्रस्ताव. १३७ जागतिक विद्यापीठांशी त्यामुळे संपर्क वाढेल. केवळ परदेशी ज्ञान भारतात आणून भागणार नाही, आपले ज्ञानदेखील जगात विस्तारले पाहिजे. आयआयटीमध्ये संशोेधन, अभ्यासोबतच प्रत्यक्ष अनुभवासाठी अनेक मोठे बदल करण्यात आले. विज्ञान शाखाविस्तारासाठी त्याचा लाभ होईल.

टॅग्स :collegeमहाविद्यालय