शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

पाकला निघालेले ऑटोक्लेव चीनच्या जहाजावरून जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 06:22 IST

लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे किंवा उपग्रह सोडणारे अग्निबाण निर्मितीसाठी केला जाऊ शकतो, असे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेतील (डीआरडीओ) तज्ज्ञांनी म्हटले.

नवी दिल्ली : चीनचे जहाज दाई कुई युनवरून जप्त करण्यात आलेल्या औद्योगिक ऑटोक्लेव्हचा वापर लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे किंवा उपग्रह सोडणारे अग्निबाण निर्मितीसाठी केला जाऊ शकतो, असे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेतील (डीआरडीओ) तज्ज्ञांनी म्हटले. औद्योगिक आणि वैज्ञानिक प्रक्रिया करण्यासाठी ऑटोक्लेव हे एक प्रेशर चेम्बर म्हणून काम करते. कांडला बंदरात अबकारी विभागाने चीनचे ते जहाज गेल्या ३ फेब्रुवारी रोजी अडवले.ते कराचीतील पोर्ट कासीमला निघाले होते. या जहाजाबद्दल गुप्तचरांकडून माहिती मिळाली होती. जहाजावरील नागरी आणि लष्करी वापरासाठीचे उपकरण जप्त केल्यानंतर जहाजाला २० फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी बंदराकडे जाऊ दिले गेले. जप्त केलेले ऑटोक्लेव्ह हे इंडस्ट्रिअल ड्रायर असल्याचे खोटेच सांगण्यात आले होते.>विध्वंसक शस्त्रांसाठीवरिष्ठ सरकारी व गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डीआरडीओचे तांत्रिक तज्ज्ञ आणि क्षेपणास्त्र शास्त्रज्ञांनी कांडला कस्टम्स, परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा नियोजकांना १८ मीटर बाय चार मीटरचे आॅटोक्लेव जप्त केल्याचे मंगळवारी सकाळी सांगितले.या आॅटोक्लेवचा उपयोग मोठ्या प्रमाणावर विध्वंसाची शस्त्रास्त्रे निर्मितीसाठीच्या प्लॅटफॉर्म्समध्ये केला जाऊ शकतो. आॅटोक्लेवचा उपयोग दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या मोटारनिर्मितीत किंवा उपग्रह सोडण्यासाठीच्या मोटार बांधकामातही केला जाऊ शकतो.पाककडे ‘शाहीन-२’ ही १,५००-२,००० किलोमीटर पल्ल्याची क्षेपणास्त्रे असून, गेल्या वर्षी मे महिन्यात त्याच्या प्लॅटफॉर्मची चाचणीही झाली होती.