शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

ऑटो रिक्षा आणि ट्रकची समोरा-समोर भीषण धडक, पाच महिलांसह 10 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 12:14 IST

Accident in Assam: या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून, त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली आहे.

गुवाहाटी:असाममधील करीमगंजमध्ये एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात किमान 10 जणांचा मृत्यू झालाय, तर अनेकजण जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका ऑटो रिक्षाची सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकला जोरदार धडक बसून हा अपघात झाला. अद्याप मृतांपैकी कोणाचीही ओळख पटलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री काहीजण छठ पुजेवरून परतत असताना हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी विरोध सुरू केला. लोकांनी असाम आणि त्रिपुरा रस्ता अडवला. मृतांमध्ये चहाच्या बागेत काम करणाऱ्या लोकांचा समावेश असल्याचा अंदाज आहे. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वर बैठाखल भागात गुरुवारी पहाटे घडली. हे ठिकाण असाम-त्रिपुरा सीमेवर असलेल्या करीमगंज जिल्ह्यातील पाथरकंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. 

मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश

वाहनांच्या धडकेनंतर नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी सांगितले की, 'अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश मुले आणि महिला आहेत. छठपूजा आटोपून ते रिक्षातून घरी परतत होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने ऑटो रिक्षाला धडक दिली. मृतांमध्ये तीन पुरुष, पाच महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.

ट्रक चालक फरारया अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून, त्याचा सध्या पोलिसांकडून शोध सुरू आहे. ट्रक चालक अतिशय वेगाने गाडी चालवत होता आणि त्यामुळेच विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऑटो रिक्षाला धडकला, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन पळून गेला असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातAssamआसाम