शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

'मोदींना बोलवा तरच लस घेईन', एका व्यक्तीची अजब मागणी ऐकून अधिकारीही हैराण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 17:13 IST

Corona Vaccination : कोरोनाची लस घेण्यास इच्छुक नसलेल्या या व्यक्तीने असे म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले तर कोरोना लसीचा पहिला डोस घेईन.

नवी दिल्ली : लसीकरणाबाबत एक वेगळीच घटना मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातून समोर आले आहे. दरम्यान, या व्यक्तीने लसीकरणासाठी अशी मागणी धरून लावली आहे की, ती पूर्ण करणे अधिकाऱ्यांनाही शक्य नाही. कोरोनाची लस घेण्यास इच्छुक नसलेल्या या व्यक्तीने असे म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले तर कोरोना लसीचा पहिला डोस घेईन. तसेच, या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, याबाबत जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितले की, लस घेण्यासाठी पुन्हा एकदा त्या व्यक्तीचे मन वळवण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काय आहे प्रकरण?हे प्रकरण धार जिल्ह्यातील दाही ब्लॉकमधील असल्याचे सांगितले जात आहे. याठिकाणी आरोग्य विभागाची टीम किकरवास नावाच्या आदिवासी गावात पोहोचली आणि येथे अनेक लोकांना लस दिली. पण, जेव्हा या व्यक्तीचा नंबर आला, तेव्हा त्याने लस घेण्यास नकार देण्यास सुरुवात केली. आरोग्य अधिकाऱ्यांनी समजावून सांगितल्यानंतरही तो व्यक्ती तयार होत नव्हता. त्याच्या या नकाराला वैतागून अधिकाऱ्यांनी विचारलं की, कुणाला बोलवू म्हणजे तू लस घेशील? यावर त्या व्यक्तीने आधी सांगितले की वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलावले पाहिजे. यानंतर अधिकाऱ्यांनी विचारले की, जर दंडाधिकाऱ्यांना फोन केल्यावर तुम्ही लस घ्यायला तयार व्हाल का?  यावर ती व्यक्ती म्हणते, दंडाधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून बोलविण्यास सांगा. फक्त मी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच कोरोनाची लस घेईन.

गावात फक्त दोनच व्यक्तीनी लस घेतली नाहीआरोग्य अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, गावात केवळ दोनच लोक आहेत ज्यांनी लस घेतली नाही. यामध्ये हा व्यक्ती आणि त्याची पत्नी या दोघांचा समावेश आहे. आरोग्य अधिकारी दुबे यांनी सांगितले की, आम्ही त्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क साधू आणि त्याला लस घेण्यास पुन्हा पटवून देऊ. दरम्यान,  सर्व पात्र लोकांना पहिला डोस देण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी मेगा लसीकरण मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसMadhya Pradeshमध्य प्रदेश