शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'मला घरी जावसं वाटत नाही'; ऑस्ट्रेलियाच्या अरनॉल्ड डिक्स यांना पडली 'या' गोष्टीची भूरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 12:23 IST

बोगद्याच्या बाहेर तैनात असलेल्या बचाव कर्मचार्‍यांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यामध्ये गेल्या १७ दिवसांपासून अडकलेल्या ४१ मजुरांना मंगळवारी सायंकाळी सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. वेगवेगळे प्रयत्न करूनही गेले १७ दिवस या मजुरांना ढिगाऱ्याच्या आतच अडकून रहावे लागले होते. अखेर ऑगर मशीनने अर्धवट सोडलेले खोदाईचे काम रॅट मायनिंगच्या कामगारांनी पूर्ण केले आणि या सर्वांची सुटका झाली. 

उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यातून ४१ मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ऑस्ट्रेलियाचे मायक्रोटनलिंग तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनी भारतीय खाद्यपदार्थांची प्रशंसा केली आहे. डिस्क यांनी भारतातील लोकांना सांगितले, तुमचे जेवण उत्कृष्ट आहे. भारतीय शाकाहारी अन्न अतिशय चवदार आणि आरोग्यदायी आहे. तसेच मला घरी जावसं वाटत नाही, असंही डिक्स यांनी म्हटलं आहे. 

बोगद्याच्या बाहेर तैनात असलेल्या बचाव कर्मचार्‍यांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. त्यापैकी परदेशातून आलेले बोगदा तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनाही भारतीय शाकाहारी पदार्थ खायला मिळाले आणि ते शाकाहारी जेवणाचे चाहते झाले. अरनॉल्ड डिक्स यांनीही बोगद्याच्या तोंडावर बांधलेल्या तात्पुरत्या मंदिरात बाबा बौखनाग देवतेची पूजा केली. संपूर्ण बचाव कार्यादरम्यान, तज्ञ डिक्स नियमितपणे बाबांच्या दारात डोके टेकवताना दिसत होते. म्हणजे विज्ञानाबरोबरच परदेशी प्राध्यापकाची धर्मावरही श्रद्धा असल्याचे पाहायला मिळाले.

जगाने पाहिले...जबरदस्त नियोजन-

कामगारांना बाहेर काढल्यानंतर त्यांना तत्काळ वैद्यकीय सेवा देण्यासाठी बोगद्याच्या आत आठ खाटांचे तात्पुरते आरोग्य केंद्र उभारण्यात आले होते. सुटका करण्यात आलेल्या कामगारांसाठी सिल्क्यरापासून ३० किमी अंतरावर असलेल्या चिन्यालिसौर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात काही दिवसांपूर्वी ऑक्सिजनची व्यवस्था असलेल्या ४१ बेडसह एक विशेष वॉर्ड तयार करण्यात आला होता. डॉक्टरही सज्ज होते. गरज पडल्यास मजुरांना अधिक प्रगत रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केलेली होती. घटनास्थळी प्राथमिक तपासणीनंतर सुटका झालेल्या कामगारांना सुमारे ३० किलोमीटर दूर असलेल्या सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोगद्याच्या तोंडावर रांगेत उभ्या होत्या. रुग्णवाहिकांचा मार्ग सुकर व्हावा यासाठी मातीचा थर पुन्हा टाकण्यात आला. बोगद्याच्या आत स्ट्रेचर नेले जात होते.

१२ रॅट-माइनर्स आत गेले अन्  डोंगर पराभूत झाला 

शक्तिशाली ऑगर ड्रिलिंग मशीन शुक्रवारी ढिगाऱ्यात अडकल्याने अधिकाऱ्यांनी शेवटच्या १० मीटरचा ढिगारा खोदण्यासाठी हाताने बोरिंग करण्याची योजना आखली होती. मर्यादित जागेत हाताने पकडलेल्या साधनांचा वापर करून ड्रिलिंगचा शेवटचा भाग पूर्ण करण्यासाठी १२ रॅट-माइनर्स बोलावण्यात आले होते. त्यांनी चोख कामगिरी बजावली. त्यांचे कौशल्य आणि अनुभव कामी आला, त्यांनी २४ तासांपेक्षा कमी वेळेत १० मीटर खोदून एक अभूतपूर्व काम केले. रॅट-होल खाणकाम बेकायदेशीर असू शकते; परंतु या तज्ज्ञांची प्रतिभा आणि अनुभव यांचा योग्य वापर येथे केला गेला, असे हसनैन यांनी सांगितले. ते दिल्ली, झाशी आणि देशाच्या इतर भागातून आले होते.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडAustraliaआॅस्ट्रेलिया