शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Kerala Floods: केरळमधील पूरप्रकोपात ३२४ जणांचा मृत्यू, २ लाख नागरिक बेघर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 21:44 IST

Kerala Floods Update : केरळमधल्या या मुसळधार पावसानं आतापर्यंत 324 जणांचा बळी घेतला आहे, तर दोन लाख नागरिक बेघर झाले आहेत. 

तिरुअनंतपुरम- केरळमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. जोरदार पावसानं आलेल्या केरळ पुरात आतापर्यंत 8 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. हवामान खात्यानं राज्यातील 14 पैकी 13 जिल्ह्यांत पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच सेंट्रल वॉटर कमिशनही पुराचं पाणी तुंबणा-या भागावर नजर ठेवून आहे. केरळमधल्या या मुसळधार पावसानं आतापर्यंत 324 जणांचा बळी घेतला आहे, तर दोन लाख नागरिक बेघर झाले आहेत. केरळमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहता एनडीआरएफच्या पाच टीम तिरुअनंतपुरममध्ये दाखल झाल्या आहेत. सध्या एनडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तसेच एनडीआरएफची आणखी जवान केरळमध्ये दाखल होणार आहेत. 

 

केरळच्या मुख्यमंत्र्यांचं मदतीचं आवाहनकेरळमधल्या पथनमतित्ता जिल्ह्यातील रन्नी, अरनमुला, कोझेनचेरी गावांतील लोक मुसळधार पावसामुळे घरातच अडकून पडली आहेत. पथनमतित्ता, एर्नाकुलम आणि थरिस्सूर जिल्ह्यांतील अनेक भागात पाण्याची पातळी 20 फुटांहून अधिक आहे. त्यामुळे गल्लीबोळाला नद्यांचं स्वरूप आलं आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य केंद्रीय मंत्र्यांकडे जास्तीची मदत मागितली आहे.  दरम्यान, दिल्ली आणि पंजाब सरकारने केरळला प्रत्येकी 10 कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे. 

 

सर्वोच्च न्यायालयानं दिले निर्देशकुन्नूर, वायनाड, कोझिकोड, मलप्पुरम आणि इडुक्की जिल्ह्यांत भूस्खलनाच्या घटना समोर आल्या आहेत. याच दरम्यान गुरुवारी सर्वोच्च न्यायालयानं मल्लपेरियार धरणाची देखरेख करणा-या अधिका-यांना सूचना केली होती की, धरणाचे दरवाजे उघडण्याआधी सभोवतालच्या परिस्थितीचा आढावा घ्या आणि मगच पाणी सोडा. तसेच मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांनी परिस्थितीवर सामंजस्यानं तोडगा काढण्याचे सरकारला सांगितले आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळNarendra Modiनरेंद्र मोदी