शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

जल लवादाच्या भूमिकेकडे लक्ष

By admin | Updated: May 7, 2014 00:31 IST

डिचोली : महाराष्ट्र सरकारने गोव्याच्या सीमेवरील विर्डी येथील क˜ीका नाला येथे धरणाचा प्रस्ताव कार्यान्वित करत उंची वाढवल्याने गोव्याने आक्षेप घेतलेला असून म्हादई जल लवादासमोर हा मुद्दा उपस्थित करण्यासाठी गोव्याने तयारी केली आहे. विर्डी धरण वाळवंटी नदी गिळंकृत करण्याचा धोका असून कर्नाटकानंतर महाराष्ट्रानेही गोव्याला कात्रीत पकडण्याचा सपाटा लावला आहे.

डिचोली : महाराष्ट्र सरकारने गोव्याच्या सीमेवरील विर्डी येथील क˜ीका नाला येथे धरणाचा प्रस्ताव कार्यान्वित करत उंची वाढवल्याने गोव्याने आक्षेप घेतलेला असून म्हादई जल लवादासमोर हा मुद्दा उपस्थित करण्यासाठी गोव्याने तयारी केली आहे. विर्डी धरण वाळवंटी नदी गिळंकृत करण्याचा धोका असून कर्नाटकानंतर महाराष्ट्रानेही गोव्याला कात्रीत पकडण्याचा सपाटा लावला आहे.ऑक्टोबर २०१३ ला महाराष्ट्राने खास पूर्वतयारी आखून म्हादईचे पाणी वापरण्याचा चंग बांधला आहे. गोव्याला तिळारीचे पाणी महाराष्ट्राच्या वाट्यापेक्षा अधिक मिळत असल्याने हा धरणाचा प्रस्ताव कार्यान्वित केला आहे.महाराष्ट्राने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता तसेच आपला मसुदा म्हादई जल लवाद किंवा गोवा सरकारला सादर न करता काम हाती घेतलेले आहे. सध्या निधीअभावी काम थांबवण्यात आलेले असले तरी पुन्हा काम सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आलेला आहे.क˜ीका नाला ेयथील धरण प्रकल्पातून महाराष्ट्र १४.१३८ ............... पाणी साठवण्याच्या तयारीत आहे. २००६ साली फवाची कोण येथे गोव्याच्या सीमेपासून ५०० मीटर अंतरावर धरणाला गोवा सरकारने अतिरिक्त पाणी अंजुणे धरणात सोडण्याच्या अटीवर मान्यता दिली होती.परंतु गोवा सरकारला अंधारात ठेवून महाराष्ट्राने धरणाची जागा बदलून क˜ीका नाला येथे काम सुरू केले.या प्रकल्पास म्हादई बचाव अभियानाने तीव्र विरोध करताना आवाज उठवला होता.मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून महाराष्ट्राने धरणाची उंची मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. दोडामार्गचे माजी आमदार दीपक केसकर यांनी सरकारला धरणाची उंची वाढवण्याची विनंती केल्याचे सांगितले. त्यानुसार सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन उंची वाढवला आहे.या पार्श्वभूमीवर वाळवंटी नदीवर संकट ओढवण्याचा धोका निर्माण झालेला असून तीन जलशुद्धीकरण प्रकल्पांना ८२ एमएलडी पाणीपुरवठा करणारी नदी तसेच जलसिंचनासाठी ७५५१ .............. पाणी ओढणारे १६ पंप प्रत्येक १७५ क्षमतेचे या वाळवंटीच्या पाण्यावर वावरत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या दरणाचा फटका गोव्याला बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून याबाबत जलसंसाधन खात्याचे अभियंता येराग˜ी यांनी वाळवंटीवर परिणाम होण्याचे संकेत दिले आहेत. जलसंसाधन मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी याप्रसंगी गोवा गंभीर भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले.लवादाच्या भूमिकेकडे लक्षविर्डी प्रकरणी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जल लवादासमोर हा प्रश्न उपस्थित करण्याबाबत जलसंसाधन खात्याला पत्रव्यवहार करण्याचे आदेश दिलेले आहेत. जल लवादाने कर्नाटकाला प्राथमिक स्तरावर म्हादईचे पाणी वळवण्यापासून सक्त विरोध करताना मलप्रभेत जाणारे पाणी काँक्रिट घालून बंद करण्याचा आदेश दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रालाही बेकायदा कृत्याबाबत लवादाचे त्रिसदस् मंडळ कोणती कारवाई करते याकडे गोव्याचे लक्ष आहे. (प्रतिनिधी)फोटो ओळी-विर्डी धरण माध्यमातून पाणी भुयारी कालवे खोदून वळवण्याची महाराष्ट्राची योजना आहे. त्यामुळे वाळवंटीवर संकट ओढवण्याचा धोका आहे. (विशांत वझे)