शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष २०२४! भारत जोडो यात्रेनंतर आता काँग्रेस खा. राहुल गांधींचा काय आहे नवा प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 16:00 IST

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा संपायच्या आधीच काँग्रेसनं दुसरं अभियान सुरू केले आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसची भारत जोडो यात्रा सोमवारी श्रीनगरमध्ये संपली. २०१४ ला काँग्रेस देशातील सत्तेतून बाहेर गेली. निसटता जनाधार आणि कमकुवत होत असलेल्या पक्षसंघटनेला पुन्हा नवजीवन देण्यासाठी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत ४ हजार किमीहून जास्त पदयात्रा काढली. यावेळी राहुल गांधींनी बेरोजगारी, आर्थिक आणि सामाजिक असंतुलनसारखे मुद्दे पुढे आणले. भारत जोडो यात्रा संपल्यानंतर आता राहुल गांधींचा पुढचा प्लॅन काय असा प्रश्न उभा राहिला.

५ महिने चाललेल्या भारत जोडो यात्रेत ही अराजकीय होती असं म्हटलं जात होते. परंतु कुठल्याही पक्षाच्या नेत्याने काढलेली यात्रा नेहमी राजकारणाशी जोडलेली असते. त्यामुळे राहुल गांधींच्या या यात्रेचा काँग्रेसच्या राजकारणाशी संबंध आहेच. राहुल गांधींच्या यात्रेमुळे काँग्रेसमध्ये उत्साह आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलं आहे. आता राहुल गांधींच्या नेतृत्वात पदयात्रेचा दुसरा टप्पा जाहीर करण्यात आला आहे. २०२४ पर्यंत काँग्रेसनं स्वत:ला सक्रीय ठेवण्यासाठी ग्राऊंडवर उतरून वातावरण निर्मिती करण्याचा खास प्लॅन बनवला आहे. 

काँग्रेसचं हाथ से हाथ जोडो अभियानराहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा संपायच्या आधीच काँग्रेसनं दुसरं अभियान सुरू केले आहे. देशाच्या वेगवेगळ्या राज्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेसनं हाथ से हाथ जोडो अभियान सुरू केले आहे. हे अभियान ३ महिने चालेल. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतील अनुभव असलेले पत्र घेऊन काँग्रेस नेते-कार्यकर्ते गावोगावी, घरोघरी जात लोकांना भेटतील. त्याअंतर्गत जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय संमेलन आणि रॅली आयोजित करण्यात येणार आहे. 

राहुल गांधी पुन्हा पदयात्रा काढणारहाथ से हाथ जोडो अभियानानंतर काँग्रेस भारत जोडो यात्रा अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा प्लॅन करत आहे. काँग्रेस महासचिव के. सी वेणुगोपाळ यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधींच्या नेतृत्वात पदयात्रेचा दुसरा टप्पा सुरू होईल. या पदयात्रेचा फायनल रोडमॅप बनला नाही. परंतु दुसरा टप्पा नक्कीच निघेल ज्यात राहुल गांधी सहभागी होतील. 

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात दुसऱ्या टप्प्यात पदयात्रा तेव्हा निघेल जेव्हा देशातील महत्त्वाच्या राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण असेल. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान , कर्नाटकसारख्या राज्यात निवडणुका आहेत. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. २०२३ हे पूर्ण वर्ष काँग्रेस एक्टिव्ह राहण्याचा प्लॅन बनवला आहे. काँग्रेस छत्तीसगडच्या रायपूर इथं २४ ते २६ फेब्रुवारीपर्यंत अधिवेशन आयोजित करेल. ज्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे संघटनात्मक निर्णय घेतील. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस