शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
6
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
7
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
8
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
9
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
10
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
11
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
12
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
13
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
14
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
15
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
17
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
18
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
19
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
20
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
Daily Top 2Weekly Top 5

लाठीमाराद्वारे विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न; विरोधकांचा लोकसभेत आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 02:24 IST

फी वाढ रद्द करण्याची मागणी

नवी दिल्ली : वसतिगृहांमधील फीमध्ये केलेली वाढ रद्द करावी या मागणीसाठी निदर्शने करणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थ्यांवर लाठीमार करून पोलिसांनी त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला, असा आरोप विरोधी पक्षांनी मंगळवारी लोकसभेत केला.तृणमूल काँग्रेसचे सौगता रॉय, काँग्रेसचे टी.एन. प्रथपन, बसपचे दानिश अली यांनी हा विषय शून्य प्रहरात उपस्थित केला. प्रथपन यांनी सांगितले की, केंद्र सरकार उच्चशिक्षण देणाºया संस्थांची धुळधाण उडवत आहे. जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचारांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी, अशी मागणी त्यांनी केली.पावसाचे २,३९१ बळीयंदाच्या वर्षी पावसाने माजविलेल्या हाहाकारात देशभरात २,३९१ माणसांचा बळी गेला व आठ लाखांहून अधिक घरांचे नुकसान झाले, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत दिली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या १७६ पथकांनी ९६,९६२ लोकांची तसेच ६१७ प्राण्यांची सुटका केली. तसेच २३,८६९ जणांना वैद्यकीय मदत पुरविण्यात आली.नक्षली कारवायांत घटमे २०१४ ते एप्रिल २०१९ या कालावधीत पूर्वीच्या पाच वर्षांच्या तुलनेत नक्षलवाद्यांकडून होणाºया हिंसक घटनांत ४३ टक्के इतकी घट झाली आहे, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी लोकसभेत सांगितले.राज्यसभा मार्शलच्या गणवेशाचा पुनर्विचारराज्यसभेच्या मार्शलना (सुरक्षारक्षक) लष्करी जवानांसारखा नवा गणवेश देण्यात आला असून, या प्रकरणाचा आढावा घेण्याचे आदेश राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी दिले आहेत. या गणवेशावर लष्कराचे माजी अधिकारी व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी टीका केली होती. राज्यसभेच्या मार्शलच्या नव्या गणवेशाचे स्वरूप या सभागृहाच्या सचिवालयाने ठरविले होते. हा गणवेश कसा असावा, याबद्दल काही राजकीय नेत्यांनीही सूचना केल्या होत्या.