शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

देशात हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 12:33 IST

अदानींच्या कंपनीतील २० हजार कोटी कुणाचे याचे उत्तर द्या असं आव्हान खासदार संजय राऊतांनी मोदींना दिले. 

नवी दिल्ली - देशाची ताकद प्रचंड आहे. विरोधी पक्षांची ताकद प्रचंड आहे. सत्ताधाऱ्यांना हा देश गुलाम करून आम्हाला बंधनात पकडायचं आहे. ही बंधने तोडण्याची वेळ आलीय. दिल्लीत काँग्रेस पक्षाने जो मोर्चा काढला, महिला खासदार, महिला कार्यकर्त्यांशी असभ्य वर्तन दिल्ली पोलिसांनी केले. ही हुकुमशाही आणि गुलामगिरी लादण्याचा हा प्रयत्न आहे असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, या देशात विरोधकांचा आवाज दाबण्याची, आंदोलन होऊच द्यायची नाहीत हे ठरवलेले आहे. निवडणूकसुद्धा हे भ्रष्टमार्गाने जिंकले का असा प्रश्न निर्माण होतोय. देशातील जनता रस्त्यावर उतरताना दिसतेय त्यावरून यांना लोकांनी मतदान केले नाही हे स्पष्ट होते. शरद पवारांनी EVM बाबत बैठक घेऊन प्रश्न उभे केले. त्याबाबत आम्ही पुढे जाऊ असं त्यांनी सांगितले. 

अदानींचे २० हजार कोटी कुणाचे? बदल्याचं राजकारण सुरूच आहे. बदला कुणाशी आणि का घेतायेत, तसेच त्यासाठी देश लुटणाऱ्या गौतम अदानींच्या मागे का उभे आहेत याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेत केलेले भाषण पुरेसे बोलके आहे. अदानी हा चेहरा आहे त्यांचे पैसे मोदींचे आहेत याचा तपास व्हायला हवा. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असल्यापासूनच अदानींचा उदय झाला. हजारो-शेकडो कोटींचा भ्रष्टाचार सुरू असताना आजही मोदी सर्व विषयावर बोलतात. विरोधकांशी संघर्ष करतात पण यावर बोलत नाहीत. अदानींच्या कंपनीतील २० हजार कोटी कुणाचे याचे उत्तर द्या असं आव्हान खासदार संजय राऊतांनी मोदींना दिले. 

सावरकर हा विषय संपलासावरकर विषय आमच्यासाठी संपलेला आहे. शरद पवारांनी एक भूमिका घेतली. काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा झालीय. भविष्यात काय होतंय ते पाहा असं सांगत खासदार संजय राऊतांनी सावरकर वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधी