हवाईसुंदरीचे कपडे फाडण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: February 21, 2017 01:22 IST2017-02-21T01:22:58+5:302017-02-21T01:22:58+5:30

गेल्या काही वर्षांमध्ये आयटी सिटी म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या बंगळुरू शहरात अलीकडील काळात गुन्हेगारीही खूपच वाढू लागली

An attempt to tear off airborne clothes | हवाईसुंदरीचे कपडे फाडण्याचा प्रयत्न

हवाईसुंदरीचे कपडे फाडण्याचा प्रयत्न

बंगळुरू : गेल्या काही वर्षांमध्ये आयटी सिटी म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या बंगळुरू शहरात अलीकडील काळात गुन्हेगारीही खूपच वाढू लागली आहे. अलीकडेच एका हवाईसुंदरीचे कपडे भर रस्त्यात फाडण्याचा प्रयत्न झाला. शहरातील हेन्नूर रोड आणि बनासवाडी रोड या उच्चभ्रू भागात हा प्रकार घडला.
ही हवाईसुंदरी मैत्रिणींसह या भागात आली असताना, मोटरसायकलवरून आलेल्या एका तरुणाने तिची छेड काढली आणि नंतर तिच्यावर जबरदस्ती करताना तिचे कपडे फाडण्याचे प्रयत्न केले. त्या वेळी तिथे असलेल्या दोन महिलांनी आरडाओरडा करताच, तो तरुण मोटरसायकलवरून लगेच निघूनही गेला. हवाईसुंदरीने या प्रकाराची पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असे सांगण्यात आले. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
यापूर्वी ३१ डिसेंबर रोजीही बंगळुरू शहराच्या ब्रिगेड रोडवर तरुण मुलींचाही जमावाने विनयभंग केला होता. त्या वेळी काही जणांनी या तरुणींचा पाठलाग करून त्यांना त्रास दिला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: An attempt to tear off airborne clothes