शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कमलनाथ यांचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न; दिग्विजय सिंहांविरोधात सोनियांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 19:58 IST

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार आहे.

भोपाळ : वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंहांविरोधात मंत्र्याने आघाडी उघडली असून थेट सोनिया गांधी यांनाच पत्र लिहिले आहे. 

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. या कमलनाथ सरकारला अस्थिर करण्याचे प्रयत्न दिग्विजय करत असल्याचा आरोप या मंत्र्याने केला आहे. पत्रात त्यांनी दिग्विजय यांच्यावर सर्व सूत्रे आपल्याकडे घेण्याचे प्रयत्न सुरू केल्याचा आरोप केला आहे. राज्याचे वनमंत्री उमंग सिंघार यांनी पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. 

सिंघार यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर पडद्यामागून सरकार चालविण्याचाही आरोप केला आहे. तसेच अनेक मंत्री त्यांच्याविरोधात दबक्या आवाजात दखल देत असल्याबद्दल बोलत आहेत, असे म्हटले आहे. दिग्विजय यांनी काही दिवसांपूर्वी मंत्र्यांना पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी मंत्र्यांकडे चर्चेसाठी वेळ मागितला होता. याबाबत सिंघार यांनी सांगितले  की, दिग्विजय सिंह पडद्यामागून सरकार चालवत आहेत. हे जगजाहीर आहे. मग त्यांना पत्र लिहायची गरज काय पडली. त्यांना यातून काय दाखवायचे आहे, असा सवालही त्यांनी केला आहे. 

मंत्र्यांची चुप्पी दिग्विजय सिंह यांच्या विरोधातील पत्रातील आरोपांवर अन्य मंत्र्यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर दुसरीकडे बाला बच्चन, आरिफ अकील, विजयलक्ष्मी साधो, गोविंद सिंह राजपूत, सुखदेव पांसे या मंत्र्यांनी दिग्विजय हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, यामुळे त्यांना कामावर लक्ष ठेवण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश