शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

केरळात भाजपा व माकप नेत्यांच्या घरांवर हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 07:39 IST

कोणीही जखमी नाही : शबरीमाला प्रकरण पेटले, १८00 लोकांना अटक

कन्नूर: शबरीमाला मंदिरात महिलांनी प्रवेश केल्यानंतर भाजप व संघ परिवारातील संघटनांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे केरळ अद्याप धुमसत असून, कन्नूर जिल्ह्यात हिंसाचार सुरू आहे. भाजपा विरुद्ध माकप असे त्याचे स्वरूप असून, या प्रकरणी तेथील ३३ जणांना अटक झाली आहे.

भाजपा व संबंधित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री कन्नूरमधील माकपचे आमदार ए. एन. शमशेर व पी. शशी यांच्या घरांवर बॉम्ब फेकले. त्यानंतर माकपच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे राज्यसभा सदस्य व्ही. मुरलीधर यांच्या घरावर बॉम्ब फेकला. आतापर्यंत केरळमध्ये सुमारे १८00 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या बॉम्बहल्ल्यांमध्ये कोणीही जखमी झालेले नाही. तलास्सेरीचे आ. शमशेर शांतता सभेत भाषण करीत असताना, त्यांच्या घरावर बॉम्ब फेकण्यात आला. हा भाजपाचा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप शमशेर यांनी केला आहे. पी. शशी यांच्या घरावरही रात्री हल्ला झाला. त्यानंतर काही वेळातच इरिट्टी भागात माकपच्या कार्यकर्त्यावर चाकूने वार करण्यात आले. त्यामुळे माकपचे कार्यकर्ते संतापले होते. शशी यांच्यावरही चार जणांनी हल्ल्याचा प्रयत्न केला होता. (वृत्तसंस्था)माकपचे कार्यकर्तेही आक्रमकच्या प्रकारांनंतर भाजपा खासदार मुरलीधर व तिरुवंगड येथील संघाचे नेते के. चंद्रशेखर तसेच भाजपाचे थलास्सेरी मंडळाचे अध्यक्ष सुमेश अशा तिघांच्या निवासस्थानी हल्ले झाले. हे हल्ले माकपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजपा व संघ परिवाराने केला आहे. या तिन्ही नेत्यांना वा त्यांच्या कुटुंबीयांना इजा झाली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Sabarimala Templeशबरीमला मंदिरKeralaकेरळ