शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर हल्ला करणाऱ्यांची ओळख पटली, लुकआउट नोटीसही जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 08:14 IST

एनआयएने लुकआउट नोटीससह ४५ लोकांचे फोटो जारी केले आहेत.

ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर नुकत्याच झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटली असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) बुधवारी दिली. एनआयएने लुकआउट नोटीससह ४५ लोकांचे फोटो जारी केले आहेत. या लोकांनी मार्चमध्ये लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाची तोडफोड केली होती. तसंच त्यांच्यावर राष्ट्रीय ध्वज तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप आहे.

बुधवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक संदेश शेअर केला. १९ मार्च २०२३ रोजी हे लोक लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्ल्यात सहभागी होती. त्यांनी भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केला. जर कोणाकडे यांच्याबद्दल माहिती असेल तर कृपया ९१७२९०००९३७३ वर माहिती द्या, असा मेसेज लिहिण्यात आलाय. यापूर्वी सोमवारी (१२ जून) एनआयएनं लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात तोडफोडीच्या प्रयत्नाचं दोन तासांचे सीसीटीव्ही फुटेज जारी केले होते. एनआयएने सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या लोकांची माहिती एजन्सीला देण्याचं आवाहन केलं आहे.

हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेजएनआयएनं खलिस्तानी हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज जारी केलं असून, माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यात एक व्हॉट्सअॅप क्रमांक देण्यात आला असून त्यासोबत तोडफोड करणाऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. १९ मार्च २०२३ रोजी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर या लोकांनी हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज अपलोड करण्यात आलं आहे. सर्व लोकांना विनंती आहे की या संदर्भात काही माहिती मिळाल्यास ७२९०००९३७३  या क्रमांवर ती देता येईल. माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाईल, असं एनआयएनं म्हटलंय.

तिरंग्याचा अपमान१९ मार्च रोजी लंडनमधील खलिस्तान समर्थक आंदोलक भारतीय उच्चायुक्तालयाच्या बाल्कनीवर चढला आणि त्यानं भारतीय ध्वज खाली खेचला होता. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाEnglandइंग्लंड