शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 21:12 IST

पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP नेत्यांचा भाजपवर आरोप

नवी दिल्ली: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शुक्रवारी(दि.25) पदयात्रेदरम्यान हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. भाजपने पाठवलेल्या गुंडांनी केजरीवालांवर हल्ला केल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. आप नेते मनीष सिसोदिया म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ला अत्यंत निंदनीय आणि चिंताजनक आहे. भाजपने आपल्या गुंडांच्या मार्फत हा हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. अरविंद केजरीवाल यांना काही झाले, तर त्याची संपूर्ण जबाबदारी भाजपवर राहील. 

भाजपला केजरीवालांना मारायचे आहेः मुख्यमंत्री आतिशी

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या की, आज अरविंद केजरीवाल यांच्या पदयात्रेत भाजपच्या गुंडांनी हल्ला केला. भाजपचे काही कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांना पुष्पहार घालण्यासाठी आले आणि त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न झाले आणि प्रत्येक वेळी या हल्ल्यांमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले. भाजपला केजरीवालांना मारायचे आहे, असा आरोप आतिशी यांनी केला. 

विकासपुरी पदयात्रेदरम्यान हल्ला आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की, विकासपुरी पदयात्रेदरम्यान भाजपशी संबंधित लोकांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. ईडी, सीबीआय आणि तुरुंगात जाऊनही काम झाले नाही, त्यामुळे आता भाजपचे लोक अरविंद केजरीवालांवर हल्ला करत आहेत. केजरीवाल यांना काही झाले तर त्याला भाजप थेट जबाबदार असेल. अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगात असताना त्यांचे इन्सुलिन बंद करण्यात आले होते, त्यांची किडनी खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आला, आता असा हल्ला भ्याडपणाचा आहे. 

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीBJPभाजपा