शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवाद्यांकडून गोळीबार; ३ दिवसांत तिसऱ्यांदा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 08:14 IST

डोडा जिल्ह्याच्या चतरगला भागात दहशतवाद्यांनी ४ राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांच्या संयुक्त चौकीवर गोळीबार केला.

जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये मंगळवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी लष्कराच्या चौकीवर हल्ला केला. यावेळी दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी सुद्धा प्रत्युत्तर दिले. या सुरुवातीच्या गोळीबारात दोन जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील चतरगला भागात ४ राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांच्या संयुक्त चौकीवर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. यानंतर याठिकाणी दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

अतिरिक्त पोलिस महासंचालक आनंद जैन यांनी सांगितले की, डोडा जिल्ह्याच्या चतरगला भागात दहशतवाद्यांनी ४ राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांच्या संयुक्त चौकीवर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा जवानांनीही प्रत्युत्तर दिले आणि त्यानंतर चकमक सुरू झाली. सध्या ठिकाणी चकमक सुरू आहे. डोडा येथे झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान जखमी झाले असून, दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. 

कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ (IB) एका गावात काल संध्याकाळी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली आहे. अशावेळी हा हल्ला झाला आहे. कठुआ जिल्ह्यातील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक नागरिक जखमी झाला आहे. तसेच, कठुआ कारवाईत सुरक्षा दलांनी एका संशयित पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

नुकतेच, रविवारी पोनी परिसरातील तेरायथ गावाजवळील शिव खोडी मंदिरापासून कटरा येथे जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. या दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर बस दरीत कोसळली. या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून ४१ जण जखमी झाले आहेत.

'या' वृत्तांचे खंडन दरम्यान, एडीजीपी जम्मू यांनी ट्विट केले आहे की, "आमच्या लक्षात आले आहे की, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात खोट्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. या खोट्या बातम्यांमध्ये दावा केला जातो की, एका ठिकाणाहून तीन नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत आणि दहशतवाद्यांनी काही गावकऱ्यांना ओलीस ठेवले आहे. आम्ही जनतेला शांत राहण्याचे आणि अशा निराधार अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करतो. तसेच, यावर नियंत्रण न ठेवल्यास या चुकीच्या माहितीमुळे उद्या जम्मू शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी