बीफ पार्टी दिली म्हणून आमदारावर हल्ला

By Admin | Updated: November 25, 2015 18:33 IST2015-11-25T18:24:35+5:302015-11-25T18:33:26+5:30

जम्मू काश्मीरमधील आमदार अब्दुल राशिद यांच्यावर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे.

The attack on the MLA as the beef party was given | बीफ पार्टी दिली म्हणून आमदारावर हल्ला

बीफ पार्टी दिली म्हणून आमदारावर हल्ला

>ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. २५ - जम्मू- काश्मीरमधील आमदार अब्दुल रशिद यांच्यावर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील आमदार निवासस्थानात आमदार अब्दुल रशिद यांनी बीफ पार्टीचे आयोजन केल्याच्या कारणावरुन नाराज झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी आमदार अब्दुल रशिद यांच्याविरोधात घोषणाबाजी आणि काळे झेंडे दाखविले. तसेच, त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या असून अब्दुल रशिद यांना किरकोळ जखम झाली असल्याचे त्यांच्या प्रवक्तांने सांगितले. ज्यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला, त्यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली असल्याचेही प्रवक्तांने सांगितले. 
दरम्यान, याआधीही आमदार अब्दुल राशिद यांनी बीफ पार्टीचे आयोजन केल्यावरुन मोठा वाद उफाऴला होता.त्यानंतर त्याच्यावर आता हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

Web Title: The attack on the MLA as the beef party was given