शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

दिल्ली मुख्य सचिव अंशु प्रकाश मारहाण प्रकरणी आप आमदार प्रकाश जरवाल अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 9:09 AM

आपचे आमदार प्रकाश जरवाल यांना अटक करण्यात आली.

नवी दिल्ली- दिल्ली सरकारचे मुख्य सचिव अंशु प्रकाश यांना झालेल्या कथित मारहाण प्रकरणी आम आदमी पक्षाच्या एका आमदाराला अटक करण्यात आली आहे. आपचे आमदार प्रकाश जरवाल यांना अटक करण्यात आली. मुख्य सचिव अंशु प्रकाश यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी कारवाई करत मंगळवारी रात्री प्रकाश जरवाल यांना अटक केली. प्रकाश जरवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या ओखला या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. 

मुख्य सचिव अंशु प्रकाश यांनी दाखल केलेल्या तक्रारीत दुसरं नाव अमानतुल्ला यांचं आहे व ते मुख्य आरोपी आहेत, असा दावा केला जातो आहे. प्रकाश जरवाल यांच्या विरोधात आयपीसी कलम 186, 353, 323, 342, 504, 506 (2) आणि 120 बी व 34 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपकडून मिळालेल्या माहितीनुसार, जरवाल त्यांच्या सहकाऱ्यांसह एका लग्नासाठी जात होते. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी रात्री 11 वाजता खानपूर ट्रॅफिक सिग्नलजवळ त्यांची गाडी थांबविली. त्यावेळी जरवाल यांना अटक करण्यात आली. जरवाल यांच्या सहकाऱ्यांनी आप नेतृत्त्वाला या संदर्भातील माहिती दिली. 

दरम्यान, आपचे काऊंन्सिलर पी चौहान यांनी जरवाल यांच्या अटकेनंतर पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ते म्हणाले, आमदार जरवाल दुपारी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. त्यांनी सगळी माहितीही तेथे दिली मग त्यांना रात्री अटक करण्याची काय गरज होती? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्हीही मुख्य सचिवांविरोधात तक्रार दाखल केली पण त्यांना अटक केलं नाही. आम्ही सरेंडर करायला तयार होतो. पोलिस वाट पाहू शकले असते. 

 

नेमकं प्रकरण काय? केजरीवालांच्या निवासस्थानी आपल्याला आम आदमी पक्षाच्या दोन आमदारांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप मुख्य सचिव अंशु प्रकाश यांनी केला. सोमवारी रात्री आपण बैठकीसाठी केजरीवालांच्या निवासस्थानी गेलो असताना ही घटना घडल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले. हा सर्व प्रकार केजरीवालांसमोर घडला. मुख्य सचिवांनी या प्रकरणी दिल्लीच्या नायाब राज्यपालांची भेट घेऊन तक्रार केली. दरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयाने मुख्य सचिवांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. केजरीवालांच्या निवासस्थानी असे काहीही घडले नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.   

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीNew Delhiनवी दिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल