एटीएस आठ दिवसात अहवाल देईल एकनाथराव खडसे: दाऊदशी संभाषणाबाबत पोलिसात तक्रार का दिली नाही
By admin | Updated: May 26, 2016 22:58 IST
जळगाव : दाऊदशी कथित संभाषणासंदर्भात व इतर आरोपांबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मीडियासमोर केवळ आरोप करण्यापेक्षा पोलिसात तक्रार का दिली नाही? असा सवाल करून याप्रश्नी विषयांवर वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू असून लवकरच सत्य समोर येईल. दाऊदशी संभाषणासंदर्भात आठ दिवसात एटीएसचा अहवाल प्राप्त होईल त्यामुळे याबाबत आता जास्त बोलणे योग्य ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया महसूल तथा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
एटीएस आठ दिवसात अहवाल देईल एकनाथराव खडसे: दाऊदशी संभाषणाबाबत पोलिसात तक्रार का दिली नाही
जळगाव : दाऊदशी कथित संभाषणासंदर्भात व इतर आरोपांबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मीडियासमोर केवळ आरोप करण्यापेक्षा पोलिसात तक्रार का दिली नाही? असा सवाल करून याप्रश्नी विषयांवर वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू असून लवकरच सत्य समोर येईल. दाऊदशी संभाषणासंदर्भात आठ दिवसात एटीएसचा अहवाल प्राप्त होईल त्यामुळे याबाबत आता जास्त बोलणे योग्य ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया महसूल तथा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. खडसेंवर झालेल्या आरोपानंतर ते गुरुवारी सकाळी जिल्ात आले. सकाळपासूनच ते शिवरामनगरातील त्यांच्या मुक्ताई बंगल्यावरच उपस्थित होते. दुपारून ते मुक्ताईनगरला जाणार होते मात्र त्यांचे तेथे जाणेही रद्द झाले. पक्षातील विविध पदाधिकार्यांची त्यांना भेटण्यासाठी गर्दी झाली होती. त्यांच्यावर होत असलेल्या विविध आरोपांबाबत पत्रकारांनी खडसे यांना छेडले असता त्यांनी याप्रश्नी जास्त बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले, मी संघाचा स्वयंसेवक असून दाऊदशी बोलेलच कसा? आणि जर दमानिया यांना याबाबत माहिती होती तर त्यांनी केवळ मीडियासमोर जाण्यापेक्षा पोलिसांकडे पुरावे देऊन तक्रार का केली नाही? केवळ आरोप करणे सोपे आहे. याप्रश्नी मुंबईतील तपास यंत्रणा, केंद्रीय गुप्तचर विभाग अशा विविध पातळ्यांवर या आरोपांबाबत चौकशी सुरू असल्याने आपण बोलणे म्हणजे यंत्रणांवर दबाव आणल्यासारखे होईल. त्यामुळे जी उत्तरे दिली जातील ती चौकशीनंतर संबंधित यंत्रणांकडूनच मिळतील. एटीएसकडून याप्रश्नी आठ दिवसात अहवाल प्राप्त होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. मुक्ताईनगर दौरा रद्दखडसे दुपारून मुक्ताईनगर येथे जाणार होते मात्र त्यांनी हा दौरा दुपारनंतर रद्द केला. जळगावातच ते दिवसभर होते.