शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

मालेगाव आरोपीच्या घरात एटीएसने आरडीएक्स ठेवले! सुप्रीम कोर्टाने दिला एनआयएचा दाखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 03:28 IST

मालेगाव येथे सप्टेंबर २००९ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील एक आरोपी सुधाकर चतुर्वेदी याच्या देवळाली येथील घरात सापडलेले कथित आरडीएक्स महाराष्ट्र एटीएसचे एक पोलीस निरीक्षक बागडे यांनी तेथे नेऊन ठेवले असावे, या शक्यतेची दखल सर्वोच्च न्यायालयाने आरोपी लेफ्ट. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यास जामीन मंजूर करताना सोमवारी घेतली.

नवी दिल्ली : मालेगाव येथे सप्टेंबर २००९ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील एक आरोपी सुधाकर चतुर्वेदी याच्या देवळाली येथील घरात सापडलेले कथित आरडीएक्स महाराष्ट्र एटीएसचे एक पोलीस निरीक्षक बागडे यांनी तेथे नेऊन ठेवले असावे, या शक्यतेची दखल सर्वोच्च न्यायालयाने आरोपी लेफ्ट. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यास जामीन मंजूर करताना सोमवारी घेतली.न्या. आर. के. अगरवाल व न्या. अभय मनोहर सप्रे यांच्या खंडपीठाने त्यांच्या २५ पानी निकालपत्रात म्हटले की, एटीएसचे मूळ आरोपपत्र व नंतर एनआयएने दाखल केलेले पुरवणी आरोपपत्र यांच्यातील तफावत पाहिली तर मुळात भोपाळ येथे झालेल्या ‘अभिनव भारत’च्या बैठकीत बॉम्बस्फोटाचा कट शिजणे, त्यातील कर्नल पुरोहित यांचा सहभाग, त्यांनी स्फोटासाठी आरडीएक्स पुरविणे आणि स्फोटासाठी आरडीएक्स वापरले जाणे या सर्वांवरच प्रश्नचिन्ह उभे राहते.एनआयने केलेल्या तपासाचा हवाला देत न्यायालयाने म्हटले: कर्नल पुरोहित यांच्याविरुद्ध लष्करानेही चौकशी केली होती. त्या चौकशीत सहआरोपी सुधाकर चतुर्वेदी याच्या घरी स्फोटके तयार केल्याविषयीचे पूर्णपणे वेगळेच कथानक समोर आले. त्या चौकशीत साक्ष दिलेल्या साक्षीदाराचे एनआयने पुन्हा जबाब नोंदविल. त्यात त्याने बॉम्बस्फोटाच्या दिवशी रात्री एटीएसचे पोलीस निरीक्षक बागडे चतुर्वेदी घरी नसताना त्यांच्या घरी गेल्याचे सांगितले. यामुळे चतुर्वेदी याच्या घरी आरडीएक्स सापडल्याचे एटीएसचे म्हणणे संशयास्पद ठरते.एनआयएने तपास हाती घेतल्यावर अभियोग पक्षाच्या ७९, ११२ व ५५ क्रमांकांच्या साक्षीदारांनी आधी दिलेल्या जबान्या फिरविल्या व एटीएसने पुरोहित व इतर आरोपींना गोवण्यासाठी दमदाटी करून खोटी साक्ष देण्यास भाग पाडल्याचे सांगितले, या एनआयएच्या पुरवणी आरोपपत्रातील भागाचीही न्यायालयाने नोंद घेतली.अभियोग पक्षाच्या साक्षीदार क्र. ७९ च्या एनआयने नोंदविलेल्या फेरजबानीचा संदर्भ देत खंडपीठाने म्हटले की, या साक्षीदाराने दंडाधिकाºयांपुढे जबानी देताना सांगितले की, ‘अभिनवभारत’च्या भोपाळमध्ये झालेल्या बैठकीला आपण कधीच हजर नव्हतो. किंबहुना तपासात एटीएसने मे२००९ मध्ये भोपाळच्या राम मंदिरात नेले तेव्हाच आपण प्रथम भोपाळला गेलो होतो.धाक दाखवून घेतले जबाब?न्यायालयानेम्हटले की, एनआयएने दाखल केलल्या पुरवणी आरोपपत्रानुसार अभियोग पक्षाच्या साक्षीदार क्र.५५ कडून एटीएसने धाक दाखवून पुढील गोष्टी जबानीत वदवून घेतल्या.- सन २००६ मध्ये कर्नल पुरोहित यानी तीन शस्त्रे व त्याच्या गोळ््या आपल्याकडे ठेवायला दिल्या.- पुरोहित यांच्या देवळाली येथील घरात आपण हिरव्या पिशवीत ठेवलेले आरडीएक्स पाहिले होत.- समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटासाठी आरडीएक्स पुरविल्याचे पुरोहित यांनी आपल्याकडे कबूल केले.- आॅक्टो-नोव्हेंबर २००८ मध्ये नाशिक जिल्ह्यात काही तरी मोठे करायचे ठरल्याचे पुरोहित यांनी आपल्याला सांगितले.- मालेगाव बॉम्बस्फोट आपणच इतरांच्यामतदीने केल्याची कबुली पुरोहित यानी आपल्यापाशी दिली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय