शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Atmanirbhar Bharat Abhiyan: 'परवडणारी घरं' देणारी योजना आता मार्च 2021 पर्यंत; मध्यमवर्गीयांसाठी मोठी बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 17:42 IST

Atmanirbhar Bharat Abhiyan: गृहनिर्माण उद्योगाला चालना मिळेल, मध्यमवर्गाला परवडणारी घरं मिळतील; अर्थमंत्र्यांना विश्वास

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत महत्त्वाच्या घोषणा करताना स्थलांतरित मजूर, लहान शेतकरी, शेतमजूर यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी गृहनिर्माण आणि मध्यम वर्गासाठीही मोठी घोषणा केली. मध्यमवर्गीयांना 'परवडणारी घरं' देणारी योजना मार्च 2021 पर्यंत राबवण्यात येणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.मध्यमवर्गासाठी 6-18 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी साधी, परवडणारी घरं मिळण्यासाठी क्रेडिट लिंक सबसिडी योजना लागू करण्यात आली होती. ही योजना मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत 3.3 लाख परिवारांना याचा फायदा झाला आहे. मात्र आता ही योजना मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आल्यानं आणखी 2.5 लाख परिवारांना फायदा होईल. यामुळे गृहनिर्माण क्षेत्राला चालना मिळेल. गृहनिर्माण क्षेत्रातली कामं सुरू झाल्यानं लाखो लोकांना रोजगार मिळेल आणि मध्यमवर्गाला स्वस्तात घरं मिळतील, असं सीतारामन म्हणाल्या. काल सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी महत्त्वाच्या घोषणा करणाऱ्या अर्थमंत्र्यांनी आज स्थलांतरित मजूर, शेतकरी, फेरीवाल्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या. देशातील 3 कोटी शेतकऱ्यांनी 4 लाख 22 हजार कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता त्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी तीन महिन्यांचा दिलासा देण्यात आला आहे. किसान क्रेडीट कार्डद्वारे 25 हजार कोटी रुपये उपलब्ध करण्यात आल्याचे सीतारामन यांनी सांगितले.  पुढील दोन महिने स्थलांतरित कामगारांना मोफत जेवण देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशा कामगारांना 5 किलो तांदूळ, किलो चणा डाळ मोफत देण्यात येणार आहे. 8 कोटी कामगारांना याचा फायदा होईल. यासाठी 3500 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कामगारांना धान्य मिळेल याची जबाबदारी राज्यांनी घ्यायची आहे, असे सीतारामन म्हणाल्या. Atmanirbhar Bharat Abhiyan देशात कुठेही रेशनचे धान्य मिळणार; कामगारांना परवडणारी भाडेकरारावर घरे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन