शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या बँकेचं एटीएम वापरताय? जास्त शुल्क मोजण्यास तयार रहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 12:48 IST

सध्या यासाठी प्रति व्यवहारामागे 15 रुपये आकारले जातात

मुंबई: एटीएम वापरकर्त्यांकडून जास्त शुल्क आकारणी करण्याची मागणी एटीएम ऑपरेटर्सनी केली आहे. रिझर्व्ह बँकेनं एटीएम व्यवस्थापनाबद्दल काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी एटीएम वापरावरील शुल्क वाढवण्यात यावं, अशी ऑपरेटर्सची मागणी आहे. त्यामुळे ग्राहकानं दुसऱ्या बँकेचं एटीएम वापरल्यास त्याला 3 ते 5 रुपयांचं अतिरिक्त शुल्क मोजावं लागेल.सध्या सर्व बँका इतर बँकेच्या ग्राहकांनी त्यांचं एटीएम वापरल्यास त्यासाठी प्रति व्यवहारामागे 15 रुपये आकारतात. दर महिन्याला पाचवेळा ग्राहकांना इतर बँकेच्या एटीएमचा वापर विनाशुल्क करता येतो. मात्र त्यानंतर एटीएममधून केल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यवहारासाठी 15 रुपयांचं शुल्क द्यावं लागतं. या शुल्कात वाढ केली जावी, अशी मागणी एटीएम ऑपरेटर्सकडून केली जात आहे. ही मागणी मान्य झाल्यास दुसऱ्या बँकेचं एटीएम वापरताना अधिक शुल्क द्यावं लागेल. एटीएम वापरावरील शुल्क 3 ते 5 रुपयांनी वाढवण्यात यावं, अशी मागणी सीएटीएमआयनं केली आहे. एटीएम ऑपरेटर्सला महागाईचा सामना करावा लागत असल्याचं सीएटीएमआनं म्हटलं आहे. 'रिझर्व्ह बँकेनं एटीएम ऑपरेटर्ससाठी अतिशय कठोर निकष लागू केले आहेत. या निकषांची पूर्तता करायची झाल्यास एटीएम व्यवस्थापनासाठी येणारा खर्च वाढेल,' असं सीएटीएमआयचे संचालक के. श्रीनिवास यांनी सांगितलं. रोकड व्यवस्थापनासाठी रिझर्व्ह बँकेनं नवे नियम घालून दिले आहेत. याची अंमलबजावणी जुलैपासून केली जाणार आहे. या नियमांची अंमलबजावणी करताना खर्च वाढेल, असा सूर एटीएम ऑपरेटर्सनी लावला आहे.  

टॅग्स :atmएटीएम