शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

आतिशी २१ सप्टेंबरला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, उपराज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 17:08 IST

Atishi to be Delhi’s new CM : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील.

Atishi to be Delhi’s new CM : नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याानंतर आता आतिशी यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे. दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना २१ सप्टेंबरला आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या आतिशी यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देतील. यासोबतच आम आदमी पक्षाच्या काही आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. यावेळी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह आम आदमी पक्षाचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. 

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील. तसेच, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या आम आदमी पक्षाच्या त्या पहिल्या महिला नेत्या आहेत. दरम्यान, याआधी मंगळवारी आतिशी यांनी उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला होता. यानंतर उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी आतिशी यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. 

केजरीवाल सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या नेत्यांना पुन्हा मंत्रिपदाची शपथ दिली जाईल, असे म्हटले जात आहे. याशिवाय, दोन नवीन आमदारांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. यातील एक दलित समाजातील असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी केजरीवाल मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या मंत्र्यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते. गोपाल राय, इम्रान हुसेन, कैलाश गेहलोत आणि सौरभ भारद्वाज पुन्हा कॅबिनेट मंत्री होणार. हे जवळपास निश्चित झाले आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी मुख्यमंत्र्यांसह सात मंत्री केले जाऊ शकतात.

आम आदमी पक्षाच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्रिपदासाठी आतिशी मार्लेना यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी आतिशी यांनी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासोबत नवीन सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांची भेट घेतली. काल आम आदमी पक्षाच्या आमदारांची केजरीवाल यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. त्यात आतिशी यांची सभागृह नेतेपदी निवड केली. पाच महिन्यांनी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

आतिशी कोण आहेत? - आतिशी या पंजाबी राजपूत कुटुंबातील आहेत. त्या उच्चशिक्षित आहेत. त्यांचे आई वडील प्रोफेसर होते. दिल्लीतील कलकाजी हा आतिशी यांचा विधानसभा मतदारसंघ असून त्या वयाच्या ४३ व्या वर्षी मंत्री झाल्या. सिसोदिया यांना तेव्हा अटक झाली होती. - आतिशी यांनी २००१ साली दिल्लीतील सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून इतिहास विषय घेऊन पदवी शिक्षण पूर्ण केले. मग ऑक्सफर्ड विद्यापीठातून तिने २००३ साली इतिहासात मास्टर्स पदवी प्राप्त केली. दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक विजय सिंग तोमर आणि त्रिप्ता वाही यांचे आतिशी हे कन्यारत्न. जून १९८१ मध्ये तिचा जन्म झाला.- २०१३ साली आतिशी यांनी आम आदमी पक्षासाठी काम सुरू केले होते. २०१९ साली भाजपचे गौतम गंभीर यांनी लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला होता. पण त्यांनी काम सुरूच ठेवले व २०२० साली विधानसभा निवडणुकीत बाजी मारली. - त्यावेळी भाजपच्या धरमबीर सिंग यांचा त्यांनी पराभव केला. आपमध्ये अरविंद केजरीवाल यांनी सतत त्यांना प्रोत्साहन दिले. केजरीवाल यांना त्या आपल्या गुरु मानतात. आतिशी यांनी यापूर्वी गोव्यातही राजकीय कामाचा अनुभव घेतलेला आहे. 

टॅग्स :AAPआपdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल