शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 17:32 IST

Atishi Oath Taking, Delhi CM: १७ सप्टेंबरला अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यावर आतिशी यांच्या नावाची निवड झाली होती

Atishi Oath Taking, Delhi CM: आप नेत्या आतिशी यांनी शनिवारी दिल्लीत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दिल्लीतील कालकाजी मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झालेल्या आतिशी या केजरीवाल सरकारमध्ये बहुतांश खाती सांभाळत होत्या. आतिशी यांना सुरूवातीपासूनच अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जायचे. केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यापासून आतिशी यांना दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री बनवण्याची शक्यता वर्तवली जात होती. अपेक्षेप्रमाणे तसेच घडले. आप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आणि आज दुपारी साडेचार वाजता त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री

आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या. त्यांच्या आधी भाजपच्या सुषमा स्वराज आणि काँग्रेसच्या शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. काँग्रेसच्या शीला दीक्षित १९९८ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. १५ वर्षे २५ दिवस त्या या पदावर होत्या. तर भाजपच्या फायरब्रँड नेत्या सुषमा स्वराज १९९८ मध्ये केवळ ५२ दिवसांसाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या.

 

आतिशी यांच्यासह आणखी ५ कॅबिनेट मंत्री

आतिशी यांच्यासोबत आपचे आमदार गोपाल राय, सौरभ भारद्वाज, कैलाश गेहलोत, इम्रान हुसेन आणि मुकेश अहलावत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. सुलतानपूर माजरा येथील आमदार मुकेश अहलावत पहिल्यांदाच दिल्ली सरकारमध्ये मंत्री झाले आहेत. तर गोपाल राय, सौरभ भारद्वाज, कैलाश गेहलोत, इम्रान हुसैन हे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते.

टॅग्स :delhiदिल्लीChief Ministerमुख्यमंत्रीministerमंत्रीArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप