हिमाचल प्रदेशातील रोहतांग पास जवळ बांधला गेलेला अटल बोगदा जगात सर्वाधिक उंचीवर बांधला गेलेला सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरला असून त्याची नोंद युकेच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये घेतली गेली आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांनी उत्कृष्ट इंजीनिअरिंग साठी या बोगद्याला दिले गेलेला पुरस्कार स्वीकारला.
मनालीला लदाखशी जोडणाऱ्या आणि मनालीला लाहोल स्पिती खोऱ्याची जोडणाऱ्या या बोगद्याचे काम बीआरओने विक्रमी वेळात यशस्वी केले. अति उंचीवरील विरळ हवामान,कडाक्याची थंडी, ऑक्सिजनची कमतरता, प्रचंड उंचीचे पहाड, अतिशय दुर्गम भाग अश्या सर्व विपरीत परिस्थितीत या बोगद्याचे काम केले गेले. युकेच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस या संस्थेत मान्यताप्राप्त अशी जगातील असामान्य रेकॉर्डस प्रमाणीकरणासह नोंदविली जातात.