शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

'हा अटल बिहारी वाजपेयींचा भारत नाही', भाजपाकडून नोटीस मिळाल्यानंतर रामचंद्र गुहा यांची प्रतिक्रिया

By सागर सिरसाट | Updated: September 12, 2017 13:15 IST

गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कथित सहभाग असल्याचा आरोप प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केला होता. रामचंद्र गुहा यांच्या या आरोपामुळे कर्नाटक भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्दे भाजपाकडून नोटीस मिळाल्यानंतर हा अटल बिहारी वाजपेयींचा भारत नाही असं ट्विट गुहा यांनी केलं आहे.'भारतात आता स्वतंत्र लेखक आणि पत्रकारांचा आवाज दडपण्याचं काम सुरू आहे. इतकंच नाही तर त्यांची हत्या देखील केली जात आहे. पण आम्ही याच्यावर अजिबात शांत बसणार नाही.

मुंबई, दि. 12 - गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कथित सहभाग असल्याचा आरोप प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केला होता. रामचंद्र गुहा यांच्या या आरोपामुळे कर्नाटक भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. भाजपाकडून नोटीस मिळाल्यानंतर हा अटल बिहारी वाजपेयींचा भारत नाही असं ट्विट गुहा यांनी केलं आहे.

'भारतात आता स्वतंत्र लेखक आणि पत्रकारांचा आवाज दडपण्याचं काम सुरू आहे. इतकंच नाही तर त्यांची हत्या देखील केली जात आहे. पण आम्ही याच्यावर अजिबात शांत बसणार नाही. एखाद्या पुस्तकात किंवा लेखामध्ये केलेल्या लिखाणाचं उत्तर केवळ लेखाणातुनच देता येतं असं वाजपेयी म्हणाले होते. मात्र, आता वाजपेयींचा भारत राहिलेला नाही असं गुहा यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येला आठवडा पूर्ण होत आला तरी त्यांच्या हत्येनंतर सुरू झालेले वाद आणि आरोप- प्रत्यारोपाचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. लंकेश यांच्या हत्योमध्ये भाजपा आणि संघाचा कथित सहभाग असल्याचा आरोप रामचंद्र गुहा यांनी रिपब्लिक टीव्हीशी बोलताना केला होता. रामचंद्र गुहा यांच्या आरोपांमुळे कर्नाटक भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणिसांनी ही नोटीस बजावली आहे. तसेच राहुल गांधी यांनीही आरोप पुराव्यासकट करावेत, असे भाजपाने म्हटले आहे.

लंकेश यांच्या हत्येनंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रा.स्व. संघ आणि भाजपाविरोधात बोलणा-या प्रत्येकावर दबाव आणला जातो किंवा मारझोड केली जाते किंवा सरळ संपवलेही जाते असे वक्तव्य केले होते. यावर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व खासदार बी.एस. येडियुरप्पा यांनी जर आपले आरोप सिद्ध करणारे पुरावे राहुल यांच्याकडे असतील तर ते त्यांनी सरळ समोर मांडावेत असे आवाहन गांधी यांना केले आहे. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्यावर स्पष्ट शब्दांमध्ये ८ सप्टेंबर रोजी टीका केली होती. गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर रोजी त्यांच्या बंगळुरु येथिल राहत्या घरी मारेकर्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांच्या हत्येनंतर मारेकरी कोण असावेत यावर विविध तर्कवितर्क लढवले जात असून डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. लंकेश यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांच्या हत्येनंतर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. या हत्येचा तपास करण्यासाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.

टॅग्स :Gauri Lankeshगौरी लंकेशGauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणMurderखूनCrimeगुन्हा