शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

Atal Bihari Vajpayee: अटलजी... खंबीर बाण्याचे आदर्श नेते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 19:22 IST

कवी मनाचे अटलजी प्रसंग आला तर वज्रासारखे कठोरही होतात, हे कारगिल युद्धाच्या वेळी दाखवून दिले. १९७१ साली बांगलादेश युद्धात विजय मिळविल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले होते.

पत्रकार, प्रखर वक्ता, संवेदनशील कवी ते पंतप्रधान असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व अटलबिहारी वाजपेयीजी यांनी जागतिक राजकारणावर अमीट ठसा उमटवला. वाजपेयी नावाच्या झंझावातासोबत विदेश दौरा करण्याचे भाग्य मला १९९९ मध्ये जी-१५ परिषदेच्या निमित्ताने लाभले. ७ ते १४ फेब्रुवारीदरम्यान त्रिनिदाद-टोबॅगो, जमैका, मोरोक्को या देशांच्या भेटीत मी त्यांच्यासोबत होतो. त्यांची उभी हयात आणि एकूण राजकीय कारकीर्द खरोखरच सर्वांसाठी आदर्श ठरावी. भारतीय जनसंघाचे खासदार ते विविध विरोधी पक्षांची खऱ्या अर्थाने पहिल्यांदा मोट बांधणारे तीनवेळा पंतप्रधान हा प्रवास वाजपेयींनी स्वकर्तृत्वाने यशस्वी केला. त्यांनी शेवटपर्यंत संसदेत आपला दबदबा कायम ठेवला. 

विदेश दौऱ्यात वाजपेयीजी यांच्यातील अनेक पैलू  मला पाहता आले, प्रत्यक्ष अनुभवता आले. पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद) येथे महात्मा गांधी सांस्कृतिक केंद्राची वाजपेयी यांनी पायाभरणी केली. महात्मा गांधींचा जन्म भारतात झाला असला तरी ते साऱ्या जगाचे होते आणि वसुधैव कुटुंबकम या वैदिक स्वप्नांचे साक्षात रूप बनले होते, अशी भावना वाजपेयीजी यांनी व्यक्त केली होती. भारतात त्यावेळी ख्रिश्चनांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी नेमके पोर्ट आॅफ स्पेनचे व्यासपीठ त्यांनी निवडले होते. कारण भारताप्रमाणे त्रिनिदाद हाही एक बहुधार्मिक देश आहे. त्यावेळी त्रिनिदाद व टोबॅगोची निम्मी लोकसंख्या भारतीय वंशाची होती आणि वासुदेव पांडे हे त्या देशाचे पंतप्रधान होते. यावेळी अटलजींमधील ठाम नेतृत्वाची झलक बघावयास मिळाली.

त्रिनिदादला पोहोचण्यासाठी तब्बल २० तासांची रात्र आणि १५ हजार कि.मी.चा प्रवास आम्ही अनुभवला. दिल्लीहून एअर इंडियाचे विशेष विमान आकाशात झेपावले तेव्हा रात्रीचे ९ वाजले होते. मध्ये इंधन घेण्यासाठी पोर्तुगालची राजधानी लिसबान येथे काही काळासाठी विमान उतरले होते. त्यानंतर त्रिनिदादला पोहोचेपर्यंत  अशी एकूण २० तासांची रात्र आम्ही पहिल्यांदाच अनुभवली. 

अटलजींच्या या दौऱ्यात भारतातील आम्ही एकूण १३ पत्रकार होतो. विमानात अटलजींनी मला भेटायला बोलावले. मी मराठी वृत्तपत्र लोकमतचा मुख्य संपादक अशी ओळख करताच अटलजी म्हणाले, दर्डाजी मुझे लोकमत के बारे मे मालूम है. वैसे आपके अखबार के विचार और हमारे विचार अलग है. लेकिन आपका अखबार अच्छा काम कर रहा है. आपल्या विचारांशी ज्याची नाळ जुळत नाही, त्यांचाही कसा आदर सन्मान करावा, हा उदारवाद मला अटलजींमध्ये बघावयास मिळाला.

इकडे आम्ही विदेशात असताना मागे देशात राजकीय घटनाक्रम वेगाने वेगवेगळे वळण घेत आहे, त्याचा अंत केंद्रातील सरकार पडण्यानेही होऊ शकतो, याचा किंचितही तणाव वाजपेयींच्या चेहऱ्यावर कधीही जाणवला नाही किंवा विचलित दिसले नाहीत. सरकारचा पाठिंबा काढण्याचा इशारा देणारे ओमप्रकाश चौटाला यांना दूरध्वनी करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यास त्यांनी याच दौऱ्यात संमती दिली होती. या दौऱ्यावरून परतल्यानंतर बरोबर दोन महिन्यांनी १६ एप्रिल १९९९ रोजी वाजपेयी यांचे सरकार केवळ एका मताने कोसळले. त्या एका मताची खंत आजही सर्वांच्या स्मरणात आहे. 

दांव पर सब कुछ लगा है, रुक नही सकते टूट सकते है मगर हम झुक नही सकते असे सांगणारे कवी मनाचे अटलजी प्रसंग आला तर वज्रासारखे कठोरही होतात, हे कारगिल युद्धाच्या वेळी दाखवून दिले. १९७१ साली बांगलादेश युद्धात विजय मिळविल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले होते. एवढेच नव्हे तर संसदेत भाषण करताना एक पाऊल पुढे टाकून त्यांनी इंदिराजींना दुर्गा संबोधले होते. भारतीय जनता पार्टीतील एक उदारमतवादी नेता, पक्ष व धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करणारा नेता आज आपल्यातून निघून गेला आहे. खंबीर बाण्याच्या या आदर्श नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली !

- राजेंद्र दर्डाएडिटर इन चीफ, लोकमत समूह

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीRajendra Dardaराजेंद्र दर्डाLokmatलोकमतprime ministerपंतप्रधान