शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
4
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
5
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
6
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
7
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
8
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
10
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
11
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
12
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
13
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
14
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
15
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
16
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
17
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
18
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
19
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
20
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

Atal Bihari Vajpayee : ...म्हणून त्यांनी इस्टेट बनवली नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 04:57 IST

राजकारणात माणसे झटपट श्रीमंत होतात. नव्हे तर श्रीमंत होण्यासाठीच अलीकडे लोक राजकारणात येऊ पाहतात हा एकूण कल आहे. सारेच असे नसतील. पण अपवाद मिळणे कठीण. पण वाजपेयींचे सारेच जगावेगळे होते.

राजकारणात माणसे झटपट श्रीमंत होतात. नव्हे तर श्रीमंत होण्यासाठीच अलीकडे लोक राजकारणात येऊ पाहतात हा एकूण कल आहे. सारेच असे नसतील. पण अपवाद मिळणे कठीण. पण वाजपेयींचे सारेच जगावेगळे होते. चार दशके राजकारणात राहूनही त्यांनी इस्टेट बनवली नाही. जमीन तर सोडा, त्यांचं स्वत:च घरही उरलेले नव्हतं. ग्वाल्हेरमधले वडिलोपार्जित घर त्यांनी फार पूर्वीच देऊन टाकलं. तिथे वाचनालय आहे.सत्तेचा त्यानी स्वत:साठी तर उपयोग केलाच नाही. पण आपल्या कुटुंबियांनाही त्या मोहापासून दूर ठेवले. ‘अपने दम पे खडे रहो. नही तो भांग पीकर पडे रहो’ असे त्यांचं घरच्यांना सांगणं असे. आग्रा येथे राहणाऱ्या त्यांच्या बहिणीकडे गॅस नव्हता. खासदारांना गॅस कनेक्शनचा कोटा असतो. पण त्या कोट्यातून अटलजींनी तिला गॅस दिला नाही आणि बहिणीनेही मागितला नाही. आता बोला! राजकीय जीवनात वावरताना अटलजींनी किती संयम राखला असेल याची कल्पना या लहानशा उदाहरणावरून यावी. ते म्हणतही. मी कशाला भीत नाही. भीतो तर बदनामीला.उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील बटेश्वर हे अटलबिहारी यांचे मूळ गाव. बटेश्वरमध्ये प्राचीन काळी कान्यकुब्ज ब्राह्मणांपैकी कुणी वाजपेय यज्ञ केला . तेव्हापासून त्या परिवारात ‘वाजपेयी’ हे आडनाव पडलं असे मानलं जातं. पणजोबा, आजोबा, वडील... संस्कृतचे सारे विद्वान होते. साहित्यप्रेमी होते. बटेश्वरहून हे कुटुंब ग्वाल्हेरला आलं. अटलबिहारी यांचे वडील कृष्णबिहारी. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर संस्थानात ते राजमान्यकवी होते. व्यवसायाने शिक्षक होते. घरी श्रीमंती नसली तरी खाऊनपिऊन सुखी घर होतं. अटलबिहारींना तीन भाऊ आणि तीन बहिणी. अवधबिहारी, सदाबहारी आणि प्रेमबिहारी. अटलबिहारी हे या तिघांच्या पाठीवर जन्माला आले. अटलबिहारी शाळेत हुशार होते. पण खोडकर होते. त्यासाठी त्यांनी वडिलांच्या हातचा मारही खाल्ला. घरचे लाडके. त्यांची आई त्यांना लाडाने ‘अटल्ला’ म्हणायची. आईच्या हातचे पदार्थ त्यांना खूप आवडायचे. मूगडाळीचे लाडू, बाजरीची शिळी भाकरी, दालबाटी... ग्वाल्हेरमधल्या एका ठिकाणचा समोसा, कचोरी त्यांना खूप आवडायची. ग्वाल्हेर तर जीव की प्राण. कुटुंबवत्सल होते. घरी गेले की, राजकारण विसरून जात. घरात कुणाचं लग्न, मुंज असो, हजर रहायचे. त्यांनी लग्न केले नाही. पण भावाबहिणींची मिळून दीडशे माणसं आहेत. इतर मुलांप्रमाणे अटलबिहारी यांनीही लग्न करावे, संसार थाटावा अशी त्यांच्या आईवडिलांची खूप इच्छा होती. आईनं तर अनेक वेळा रडून त्यांना राजी करू पाहिलं. पण अटलजी बधले नाहीत. पूर्ण वेळ संघाचं काम करण्यासाठी ते बाहेर पडले होते. त्यामुळे लग्नाचा विचार त्यांनी मनातून काढून टाकलाहोता.गर्दीत राहूनही एकटे ! साठच्या दशकापासून वाजपेयींनी कौल कुटुंबाला आणि त्या कुटुंबाने वाजपेयींना आपलं मानले. जणू अटलजींचं ‘दत्तक’ कुटुंब ! नमिता भट्टाचार्य ही मानलेली मुलगी दिल्लीतल्याच एका शाळेत शिक्षिका आहे. दत्तक नात नेहा ही त्यांची अतिशय लाडकी. लग्न न करताही कुटुंबवत्सल, सतत माणसांच्या गर्दीत राहूनही एकटे वाजपेयी, गेलेही एकटे एकटे....त्यांची एक प्रसिद्ध कविता आहे -‘क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत मैंसंघर्ष पथ पर जो भी मिला, वो भी सही ये भी सही’

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीprime ministerपंतप्रधान