शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची वरदळ अन् अचानक सुरू झाला अश्लील Video; रेल्वेने केली मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 12:57 IST

Patna Junction Video : बिहारच्या पाटणा येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.

पाटणा : बिहारच्या पाटणा येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रविवारी सकाळी पाटणा जंक्शनच्या प्लॅटफॉर्मवरील डझनभर टीव्ही स्क्रीनवर अचानक अश्लील चित्रपट सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली. प्लॅटफॉर्मवर महिला आणि पुरूष आपल्या लहानग्यांना घेऊन ट्रेनची वाट पाहत उभे होते, मात्र अचानक ही घटना घडली अन् प्रवासी संतप्त झाले. याबाबत तक्रार करण्यात आली. मग आरपीएफने तात्काळ फोन करून संबंधित एजन्सीला अश्लील व्हिडीओ बंद करण्यास सांगितले. याप्रकरणी रेल्वे अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे.

जवळपास 3 मिनिटे चालला video माहितीनुसार, जवळपास तीन मिनिटे अश्‍लील चित्रपटाचा व्हिडीओ चालू असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांकडून जाहिरात एजन्सीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच डीआरएम प्रभात कुमार यांनी एजन्सीला दंड ठोठावला आहे. एवढेच नाही तर करार देखील रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.

याआधी देखील घडली अशी घटना पाटना जंक्शनच्या जवळपास सर्व प्लॅटफॉर्मवर डझनभर टीव्ही स्क्रीन लावण्यात आल्या आहेत, जेणेकरून प्रवाशांना ट्रेनची माहिती देता येईल. रविवारी घडलेली ही घटना काही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील अशा घटना समोर आल्या आहेत. त्यावेळी अधिकाऱ्यांना नंतर कळले. मात्र यावेळी माहिती मिळताच रेल्वेकडून कारवाई करण्यात आली आहे. कालची संपूर्ण घटना सकाळी 9.56 ते 9.59 या वेळेत प्लॅटफॉर्म क्रमांक दहावर झाली असल्याचे रेल्वे अधिकारी सांगत आहेत. तर काही प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरही अशी घटना घडली असल्याचे म्हणत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Biharबिहारrailwayरेल्वेSocial Viralसोशल व्हायरलsexual harassmentलैंगिक छळ