शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

किमान हमी भावाला कायद्याची हमी सरकार देऊ शकते, वरुण गांधींनी मांडलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 06:10 IST

Varun Gandhi: नोटाबंदीचा उद्देश सफल झाला नाही व अर्थव्यवस्था विस्कळीत झाली. मी मुदत ठेव मोडून कोरोनाकाळात लोकांची मदत केली. तरुण, शेतकरी, छोटे व्यापारी आणि कष्टकऱ्यांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असे मत भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी व्यक्त केले

 नवी दिल्ली : नोटाबंदीचा उद्देश सफल झाला नाही व अर्थव्यवस्था विस्कळीत झाली. मी मुदत ठेव मोडून कोरोनाकाळात लोकांची मदत केली. तरुण, शेतकरी, छोटे व्यापारी आणि कष्टकऱ्यांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असे मत भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी व्यक्त केले. वरूण गांधी यांची राजकारण आणि राजकीय भविष्याबद्दल वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी घेतलेली मुलाखत.प्रश्न : तुम्ही बेरोजगारी, उसाला भाव यासारख्या विषयांवर आपल्याच सरकारवर विरोधकांसारखी टीका करता.उत्तर : बेरोजगारी हा आज देशातील महाप्रचंड प्रश्न आहे. त्यावर बोलले तर ती टीका समजली जाऊ नये.  प्रश्न : तुमचे पक्षाशी काही मतभेद आहेत का? तुम्ही आणि मनेका गांधी यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारकांमध्ये घेतले गेले नाही.उत्तर : राष्ट्रहित आणि जनहित माझ्यासाठी सर्वोच्च आहे. मी कधी व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप केले नाहीत. स्टार प्रचारक तर लोक बनवतात. प्रश्न : तुम्ही कृषी कायद्यांना विरोधाबाबत बरेच स्पष्ट आहात. हा विरोध मूल्यांचा होता की वैयक्तिक हितासाठी? उत्तर : आधीच संकटातून जात असलेल्या शेतकऱ्यांसाठी तीन कृषी कायदे अत्याचार सिद्ध झाले असते. शेतकऱ्यांची बाजू घेणे हे माझे कर्तव्य होते. जर त्यांचे आंदोलन चूक होते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे कधी परत घेतले नसते. प्रश्न : किमान हमीभावाची (एमएसपी) कायदेशीर हमी देणे सरकारला आर्थिकदृष्ट्या शक्य आहे? उत्तर : पिकांना लाभकारी भाव हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे. मी केलेल्या अभ्यासानुसार हे सांगू शकतो की, सरकार कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा न उचलता हे करू शकते.

प्रश्न : येत्या दोन वर्षांत तुम्हाला देशाचे राजकारण कोणत्या दिशेने जाताना दिसते? उत्तर : येत्या काळात देशाची दिशा आणि राजकीय दशा या देशाचा तरुण, शेतकरी, लहान व्यापारी आणि मजूर ठरवतील. प्रदीर्घ काळापर्यंत या वर्गांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.

प्रश्न : सध्याच्या राजकारणात तुम्ही स्वत:ला कोठे बघता? उत्तर : मी राजकारणात स्वत:साठी एक आचारसंहिता लागू केलेली आहे. गेल्या १३ वर्षांपासून माझे खासदाराचे पूर्ण वेतन ज्या शेतकऱ्यांना आत्महत्या करणे भाग पडले त्यांच्या कुटुंबाच्या कामाला आली.

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीPoliticsराजकारणBJPभाजपा