शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅस्ट्राझेनिसा : ब्राझीलमध्ये स्वयंसेवकाच्या मृत्यूनंतरही सुरू राहणार कोरोना लसीच्या चाचण्या,  सर्व काळजी घेत असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 07:01 IST

प्रयोगात सहभागी असलेले दोन स्वयंसेवक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आजारी पडल्याने अ‍ॅस्ट्राझेनिसाच्या लसीचे प्रयोग काही काळ थांबविण्यात आले होते. मात्र, ब्रिटनमध्ये हे प्रयोग पुन्हा सुरू झाले असले तरी अमेरिकेत अद्याप त्यांना सुरुवात झालेली नाही.

रिओ दी जानेरिओ : अ‍ॅस्ट्राझेनिसा व ऑक्सफर्ड विद्यापीठ संयुक्तरीत्या विकसित करीत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या प्रयोगांत ब्राझीलमधील एक स्वयंसेवक बुधवारी मरण पावला; पण त्याला कोरोना लस टोचण्यात आली नव्हती, असे आता सांगण्यात येत आहे. या घटनेनंतरही ब्राझीलमध्ये या लसीचे प्रयोग पुढेही सुरूच राहणार आहेत. 

प्रयोगात सहभागी असलेले दोन स्वयंसेवक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आजारी पडल्याने अ‍ॅस्ट्राझेनिसाच्या लसीचे प्रयोग काही काळ थांबविण्यात आले होते. मात्र, ब्रिटनमध्ये हे प्रयोग पुन्हा सुरू झाले असले तरी अमेरिकेत अद्याप त्यांना सुरुवात झालेली नाही. ब्राझीलमध्ये स्वयंसेवकाच्या मृत्यूनंतरही हे प्रयोग यापुढेही सुरू राहणार आहेत. 

ब्राझीलमध्ये मृत व्यक्ती डॉक्टर असून २८ वर्षांचा होता, असे वृत्त तेथील वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले. त्याला कोरोनाची लस टोचण्यात आली नव्हती, असेही त्यात म्हटले आहे. ही व्यक्ती नेमकी कोणत्या आजारामुळे मरण पावली हे अ‍ॅस्ट्राझेनिसा किंवा ब्राझीलच्या सरकारनेही अद्याप जाहीर केलेले नाही. लसनिर्मिती संदर्भातील प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवण्यात येते. त्यामुळे या लसीच्या चाचण्या पुढे सुरू ठेवण्यास काहीही अडचण नाहीत, असे अ‍ॅस्ट्राझेनिसाने म्हटले आहे. 

जॉन्सन अँड जॉन्सनलाही बसला फटकाजॉन्सन अँड जॉन्सन कंपनी अमेरिकेत विकसित करीत असलेल्या कोरोना लसीच्या प्रयोगादरम्यान एक स्वयंसेवक आजारी पडल्याने या चाचण्या काही काळ स्थगित करण्यात आल्या. अ‍ॅस्ट्राझेनिसा लसीची चाचणी यापूर्वी काही दिवस थांबविण्यात आली होती. जॉन्सन अँड जॉन्सन, इली लिली या कंपन्या अँटीबॉडीच्या करीत असलेल्या चाचण्या स्वयंसेवकांची तब्येत बिघडल्याने थांबविण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmedicineऔषधंdocterडॉक्टरResearchसंशोधन