शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुका: मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये हरलेल्या जागांवर भाजपचे उमेदवार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 09:18 IST

अशी आहे छत्तीसगड, मध्य प्रदेशातील स्थिती

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : छत्तीसगडमध्य प्रदेशमध्ये हार पत्करावी लागलेल्या जागांवर आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला नसतानाही छत्तीसगडसाठी २१ व मध्य प्रदेशसाठी ३९ उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या विरोधात पाटन मतदारसंघात त्यांचे पुतणे विजय बघेल यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

दोन्ही राज्यांत भाजपने प्रत्येकी पाच महिलांना तिकीट दिले आहे. ज्या जागांवर विजय मिळण्याची शक्यता नाही तिथे खूप आधीपासूनच भाजपने उमेदवार घोषित केेले आहेत. त्यामुळे या उमेदवारांना पूर्वतयारी करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेशमधील विधानसभा जागांची भाजपने पुढीलप्रमाणे वर्गवारी केली आहे. हमखास विजय मिळणाऱ्या जागा अ गटात, कधी हार तर कधी विजय मिळणाऱ्या जागा ब गटात, दोनपेक्षा अधिक वेळा पराभव झालेल्या जागा क गटात, नेहमीच हार पत्कराव्या लागणाऱ्या जागा ड गटात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

छत्तीसगड, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी पहिल्या यादीतील उमेदवारांची नावे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आली. छत्तीसगडमध्ये भाजपने भुलनसिंह मारवी (प्रेमनगर विधानसभा मतदारसंघ), शकुंतला सिंह पोर्थे (प्रतापपूर), आदी २१ जणांना उमेदवारी दिली.

मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या अनुसूचित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष लाल सिंह आर्य (गोहद विधानसभा मतदारसंघ), पक्षाचे राष्ट्रीय सचिव ओमप्रकाश धुर्वे (शाहपुरा), शहला मसूद हत्याकांडप्रकरणी चर्चेत असलेले ध्रुव नारायण सिंह (भोपाळ मध्य) आदी ३९ जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधी मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत.

अशी आहे छत्तीसगड, मध्य प्रदेशातील स्थिती

२०१८ मध्ये भाजपने छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत ९० पैकी फक्त १५ जागा, तर काँग्रेसने ६८ जागा जिंकल्या होत्या, तर २३० सदस्य असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेच्या २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकांत काँग्रेसने ११४ व भाजपने १०९ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर १५ महिन्यांनी भाजपने काँग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकार पाडले व त्या जागी भाजपच्या शिवराजसिंह चौहान यांचे सरकार सत्तेवर आले होते.

 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणMadhya Pradeshमध्य प्रदेशChhattisgarhछत्तीसगड