शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

'माय का लाल' विधानावरुन भाजपाचं नुकसान, शिवराज सिंह चौहानांना घरचा अहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 1:02 PM

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगणातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. जनतेनं आपला कौल कोणत्या पक्षाला दिला आहे, याचे चित्र मंगळवारी (11 डिसेंबर) स्पष्ट होणार आहे.

ठळक मुद्देमध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवराज सिंह चौहानांवर निशाणा'माय का लाल' विधानावर भाजपा खासदाराचा आक्षेपआरक्षणाच्या मुद्यावर बोलताना केले होते विधान

भोपाळ : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगणातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. जनतेनं आपला कौल कोणत्या पक्षाला दिला आहे, याचे चित्र मंगळवारी (11 डिसेंबर) स्पष्ट होणार आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी पार पडणार आहे. दरम्यान, निकाल येण्यापूर्वीच भाजपाचे खासदार रघुनंदन शर्मा यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर निशाणा साधला आहे. शर्मा यांनी चौहान यांच्या 'माय का लाल' विधानावर आक्षेप नोंदवत प्रश्न उपस्थित केले आहेत. 

याबाबत शर्मा म्हणाले की, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या 'माय का लाल' विधानामुळे जनतेमध्ये नाराजी पसरली. या विधानामुळे आमचं नुकसान झालं आहेच. जर अशा प्रकारे शब्दांचा प्रयोग  केला गेला नसता तर आणखी 10-15 जागांवर भाजपाचा विजय होऊ शकला असता आणि अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाली नसती.

(EXIT POLL : मध्य प्रदेशमधून भाजपाची एक्झिट? पण अटीतटीच्या लढतीचा अंदाज)

पुढे शर्मा असंही म्हणाले की, कदाचित आम्ही चुकाही केल्या असतील. त्यामुळेच एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या बाजूनं कौल वर्तवण्यात आला नाही. हे अंदाज चुकीचेही सिद्ध होऊ शकतो. पण 200 हून अधिक जागा सोडाच, मागील विधानसभा निवडणुकीएवढ्याच जागा मिळाल्या तरीही आम्ही समाधान मानू.  

 

नेमके काय म्हणाले होते शिवराजसिंह चौहान?आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना शिवराजसिंह चौहान म्हणाले होते की,'कोणी माय का लाल आरक्षण रद्द करू शकत नाही.' या विधानावरुन त्यांच्यावर चौफेर टीकादेखील झाली होती. एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशात काँग्रेस सत्तेवर येईल वा सत्तेपाशी पोहोचेल. मध्य प्रदेशात काँग्रेस व भाजपात चुरशीची लढत दिसत असून, तीन चाचण्यांनी काँग्रेसला बहुमत मिळेल वा तो पक्ष सत्तेपर्यंत पोहोचेल, असे म्हटले आहे. काही चाचण्यांचे निष्कर्षमध्य प्रदेश 230 जागा 75% मतदानसर्वे भाजपा काँग्रेस इतरअ‍ॅक्सिस माय इंडिया-इंडिया टुडे 102-122 104-122 4-11टाइम्स नाऊ-सीएनएक्स 126 89 15एबीपी-लोकनीती 94 126 10इंडिया न्यूज-नेता 106 112 12रिपब्लिक 108-128 95-115 7न्यूज नेशन 108-112 105-109 11-15इंडिया टीव्ही 122-130 86-92 6-9

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराजसिंह चौहानMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018