शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

पंजाबने दिला ‘आप’ला ‘मान’; दोन राज्यांमध्ये सत्ता असलेला भाजप-काँग्रेसनंतर तिसरा पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 10:04 IST

आपच्या निर्णायक विजयानंतर पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या नागरिकांचे अभिनंदन केले आहे. केजरीवाल यांनी ट्विट केले आहे की, या क्रांतीसाठी पंजाबच्या लोकांचे खूप खूप अभिनंदन. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंदीगड : पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीत यंदा मतदारांनी आम आदमी पार्टीला भरभरून मते देत काँग्रेस, भाजप, अकाली दल यांच्यासह इतर सर्वच पक्षांना भुईसपाट करत राज्यात बदल घडवून आणला आहे. आप ९२, काँग्रेस १८, अकाली दल ४, भाजप २ तर अन्य १ याप्रमाणे या पक्षांना जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आपचे भगवंत मान यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू हे अमृतसर पूर्वमधून पराभूत झाले आहेत. आपच्या जीवनज्योत कौर यांनी सिद्धू यांचा ६,७५० मतांनी पराभव केला. 

आपच्या निर्णायक विजयानंतर पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या नागरिकांचे अभिनंदन केले आहे. केजरीवाल यांनी ट्विट केले आहे की, या क्रांतीसाठी पंजाबच्या लोकांचे खूप खूप अभिनंदन. 

हा जनादेश विनम्रपणे स्वीकारत असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी म्हटले आहे. सिद्धू यांनी ट्विट केले की, जनता की आवाज, भगवान की आवाज है... पंजाबच्या लोकांचा निर्णय विनम्रपणे स्वीकार करीत आहोत. संगरुरमध्ये पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपचे पंजाबचे सह-प्रभारी राघव चड्ढा म्हणाले, आगामी काळात आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून समोर येईल आणि काँग्रेसची जागा घेईल.

भगवंत मान म्हणाले की, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की, हे विद्यार्थी शिकण्यासाठी बाहेर का जातात, आम्ही स्वस्तात सुविधा का देत नाहीत. पंजाबला योग्य मार्गावर नेण्यासाठी प्रयत्न करू. एका महिन्यातच बदल दिसून येतील, असे सांगून ते म्हणाले की, आता मंत्री आम आदमीच्या समस्या समजावून घेण्यासाठी गावात आणि रस्त्यांवर येतील. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, प्रकाश सिंग बादल यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, यापूर्वीचे सरकार मोतीबाग पॅलेस (पटियालातील अमरिंदर सिंग यांचे निवासस्थान), बडी दिवारोंवाले घर (लाम्बीतील बादल यांचे घर) येथून चालत होते. आता हे सरकार राज्यातील लोकांचे आहे.

भगतसिंग यांच्या गावात शपथविधीआपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान हे शहीद भगतसिंग यांच्या नवांशहर जिल्ह्यात खटखड कलां या गावात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शपथ घेतल्यानंतर ते शहिदांच्या स्मारकस्थळी जाऊन दर्शन घेतील. यापूर्वी मुख्यमंत्रीपदाची  शपथ पंजाबच्या राजभवनात होत होती. मान यांनी सांगितले की, पंजाबच्या सरकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांचा फोटो लागणार नाही. सरकारी कार्यालयात आता शहीद भगतसिंग आणि राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लागतील.

टॅग्स :Punjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२AAPआप