शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Assembly Election 2022: ज्येष्ठ नेत्यांना मोदींची वेळ मिळेना, स्पष्ट संदेश कळेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 11:59 IST

Assembly Election 2022: उत्तर प्रदेश भाजपचे ज्येष्ठ नेते मागील चार दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागत आहेत. परंतु, आतापर्यंत त्यांच्यावर कृपा झालेली नाही. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या सुमारे ३०० उमेदवारांपैकी केवळ सहाजणांना त्यांच्या शिफारशीने तिकिटे देण्यात आली आहेत.

-   शरद गुप्ता 

वेळ मिळत नाहीउत्तर प्रदेश भाजपचे ज्येष्ठ नेते मागील चार दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागत आहेत. परंतु, आतापर्यंत त्यांच्यावर कृपा झालेली नाही. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या सुमारे ३०० उमेदवारांपैकी केवळ सहाजणांना त्यांच्या शिफारशीने तिकिटे देण्यात आली आहेत. यात ते पंतप्रधानांचा हस्तक्षेप मागत आहेत. परंतु, पंतप्रधान त्यांना भेटीची वेळ न देऊन त्यांना कोणता संदेश देऊ इच्छित आहेत, ही एवढी साधी बाब त्यांच्या लक्षात येत नाही.  

हार-जीतचा मंत्रउत्तराखंडच्या रानीखेतमधून कोणताही पक्ष निवडणूक जिंकू इच्छित नाही. कारण जो पक्ष येथे जिंकला त्याचे सरकार राज्यात बनू शकलेले नाही. २००२ मध्ये व २०१२ मध्ये येथे भाजप विजयी झाला, तर सरकार काँग्रेसचे स्थापन झाले. तथापि, २००७ व २०१७मध्ये काँग्रेसचे उमेदवार जिंकले तेव्हा भाजपने सरकार बनविले. परंतु, तीन जागा अशा आहेत, जेथे कोणताही पक्ष पराभूत होऊ इच्छित नाही. गंगोत्री, बद्रीनाथ व रामनगर या जागा ज्या पक्षाने जिंकल्या, त्या पक्षाने राज्यात सरकार स्थापन केले, असा इतिहास आहे.  

आपने दिला धक्काउत्तराखंडमध्ये भाजप व काँग्रेसमध्ये चाललेला संघर्ष त्रिकोणी बनविण्याचा आम आदमी पार्टीचा पुरेपूर प्रयत्न आहे. याच प्रयत्नांतून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप व काँग्रेसला या पक्षाने जबरदस्त धक्का दिला. नैनितालमध्ये अखेरच्या क्षणी भाजप नेते हेम आर्य यांना तिकीट दिले, तर प्रदेश महिला काँग्रेस सचिव राहिलेल्या मंजू तिवारी यांना कालाढूंगी येथून मैदानात उतरविले. दोन्ही जागांवर आधी जाहीर केलेले उमेदवार बदलून तेथे यांना उमेदवारी दिली गेली. या दोहोंनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी काही मिनिटे आपचे सदस्यत्व स्वीकारले.   

मुख्यमंत्री काय करीत होते? पंजाबमध्ये मागील सुमारे पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंह निवडणुकीच्या प्रचारात त्यांचा जुना पक्ष काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर आरोप करीत सुटले आहेत. मात्र, यामुळे तेच जास्त उघडे पडत आहेत. विद्यमान मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांना वाळू तस्करीला प्रोत्साहन दिल्याचा, तर नवज्योत सिंह सिद्धू यांनी वाळू तस्करांना अभय दिल्याचा आरोप केला. आता काँग्रेसचेच नेते सवाल उपस्थित करीत आहेत की, कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे हे आरोप खरे असतील तर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कोणतीच कारवाई का केलेली नाही?   

युवकांवर विश्वास नाहीभाजपने उत्तराखंडमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजयुमो अध्यक्ष राहिलेले पुष्कर सिंह धामी यांना मुख्यमंत्री केले. कारण पक्षाला धडाडीचे युवा नेतृत्व पाहिजे होते. परंतु, ७० सदस्यांच्या विधानसभेत आतापर्यंत जाहीर केलेल्या ६९ जागांपैकी एकाही जागेवर पक्षाने युवा मोर्चाच्या नेत्याला तिकीट दिलेले नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२