शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Assembly Election 2022: पाच राज्यांमध्ये १५ जानेवारीपर्यंत रोड-शो, राजकीय सभांना परवानगी नाही; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 16:49 IST

Assembly Election 2022: केंद्रीय निवडणूक आयोगानं आज देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. पाचही राज्यांमध्ये एकूण ७ टप्प्यात मतदान होणार आहे.

Assembly Election 2022: केंद्रीय निवडणूक आयोगानं आज देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. पाचही राज्यांमध्ये एकूण ७ टप्प्यात मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर करतानाच निवडणूक आयोगानं कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काही कडक निर्बंध आणि नियम देखील जाहीर केले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या प्रचार कार्यक्रमावर मर्यादा येणार आहे. 

देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता निवडणूक आयोगानं १५ जानेवारी २०२२ पर्यंत निवडणूक होणाऱ्या पाचही राज्यांमध्ये म्हणजेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला जाहीर सभा, सायकल किंवा बाईक रॅली, रोड शो आयोजित करता येणार नसल्याचं जाहीर केलं आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची निवडणूक आयोगाकडून दखल घेतली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल असंही निवडणूक आयोगानं यावेळी स्पष्ट केलं आहे. सर्व राजकीय पक्षांना यावेळी फक्त सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमातून प्रचार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

देशातील कोरोना परिस्थिती लक्षात घेता राजकीय पक्षांनी प्रसारासाठी सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करावा, असं आवाहन निवडणूक मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी केलं आहे. पाचही राज्यांमध्ये १५ जानेवारीपर्यंत कोणत्याही राजकीय सभा, सायकल किंवा बाईक रॅलीसह नुक्कड सभा आणि जनतेच्या संपर्कात येणारे तसंच गर्दी होणारे प्रचार कार्यक्रम घेता येणार नाहीत. १५ जानेवारीनंतरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील नियम जाहीर केले जातील असंही निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग