Assembly Election 2022 Date: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा शंखनाद; सात टप्प्यात मतदान, १० मार्च रोजी होणार मतमोजणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 03:51 PM2022-01-08T15:51:44+5:302022-01-08T16:24:03+5:30

Assembly Election 2022 Date: देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे बिगुल आज वाजले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सात टप्प्यामध्ये होणार मतदान होणार आहे. सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक टप्प्यात  सात टप्प्यात मतदान होणार आहे. तर १० मार्चला मतमोजणी होणार आहे.

Assembly Election 2022 Date: Assembly elections in five states; Voting in seven phases, counting of votes will take place on March 10 | Assembly Election 2022 Date: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा शंखनाद; सात टप्प्यात मतदान, १० मार्च रोजी होणार मतमोजणी 

Assembly Election 2022 Date: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा शंखनाद; सात टप्प्यात मतदान, १० मार्च रोजी होणार मतमोजणी 

Next

नवी दिल्ली - देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे बिगुल आज वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सात टप्प्यामध्ये होणार मतदान होणार आहे. सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक टप्प्यात  सात टप्प्यात मतदान होणार आहे. 

मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पाच राज्यातील निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशसह ऊर्वरित चारही राज्यांमध्ये आजपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.  सर्व पाच राज्यात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. एकूण ४०३ आमदार असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सर्व सात टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान हे ७ मार्च रोजी होणार आहे. तर मतमोजणी ही १० मार्च रोजी होईल. 

पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यामध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या तिन्ही राज्यांमध्ये १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये २७ फेब्रुवारी आणि ३ मार्च अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये १०, १४, २०, २३, २७ फेब्रुवारी आणि ३ व ७ मार्च अशा एकूण सात टप्प्यात मतदान होईल. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ह्या निवणुका होत असल्याने निवडणूक आयोगाने त्यासाठी काही खास उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाकाळात निवडणूक घेणे आव्हानात्मक असल्याचे सांगत मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा म्हणाले की, कोरोनाकाळात सुरक्षितपणे निवडणुका घेणे ही आमची जबाबदारी आहे. वेळेत निवडणुका घेणे ही आमची जबाबदारी असून, कोरोनाचे सर्व नियम पाळून ह्या निवडणुका घेतल्या जातील. प्रत्येक बुथवर मास्क आणि सॅनिटायझरची व्यवस्था केली जाईल. या निवडणुकीमध्ये एकूण १८.३ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामधील साडे आठ कोटी मतदार ह्या महिला आहेत. तर २४ लाखांहून अधिक मतदार हे पहिल्यांदान मतदानाचा हक्क बजावतील.

८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक. दिव्यांग आणि कोरोनाबाधित रुग्ण हे मतपत्रिकांच्या माध्यमातून मतदान करू शकतील. कोरोनामुळे पाचही राज्यातील मतदानाची वेळ एका तासाने वाढवण्यात आली आहे. तसेच सर्व उमेदवारांना त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती माहिती द्यावी लागणार आहे. तसेच १५ जानेवारीपर्यंत  कुठल्याही सभा, पदयात्रा, सायकल यात्रा यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. याबाबत पुढील निर्णय नंतर घेण्यात येईल, असे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

२०१७ मधे झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने ३०० हून अधिक जागा जिंकत विजय मिळवला होता. तर उत्तराखंडमध्येही भाजपाने निर्विवाद वर्चस्व राखले होते. गोवा आणि मणिपूरमध्ये त्रिशंकू निकालांनंतर बहुमताची जुळवाजुळव करत सरकार स्थापन केले होते. तर पंजाबमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन केली होती. 

Web Title: Assembly Election 2022 Date: Assembly elections in five states; Voting in seven phases, counting of votes will take place on March 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.