शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

CoronaVirus News: काल हायकोर्टानं झापलं, आज शहाणपण सुचलं; निवडणूक आयोगानं घेतला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 10:52 IST

CoronaVirus News: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरून मद्रास हायकोर्टानं कानउघाडणी केल्यावर अखेर निवडणूक आयोगानं घेतला महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार आहे, अशी खरमरीत टिप्पणी काल मद्रास उच्च न्यायालयानं केली. उच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान निवडणूक आयोगाची चांगलीच कानउघाडणी केली. निवडणूक असलेल्या राज्यांत हजारोंच्या सभा सुरू होत्या, तेव्हा तुम्ही दुसऱ्या ग्रहावर होतात का, अशा सवाल न्यायालयानं उपस्थित केला. यानंतर आता निवडणूक आयोगानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २ मे रोजी चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर विजयी मिरवणुका काढू नका, अशी सूचना निवडणूक आयोगानं केली आहे. निवडणूक आयोगानं मिरवणुकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात लवकरच आयोगाकडून आदेश काढण्यात येणार आहे. काय म्हणालं मद्रास उच्च न्यायालय?राजकीय पक्षांना प्रचारसभा घेण्यासाठी परवानगी कशी दिलीत, असा सवाल मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीब बॅनर्जींनी काल झालेल्या सुनावणीदरम्यान उपस्थित केला. देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात. तुमच्या अधिकाऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल व्हायला हवा, अशा शब्दांत न्यायालयानं संताप व्यक्त केला. न्यायालयाच्या आदेशानंतरही निवडणूक प्रचारसभांमध्ये फेसमास्क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे नियम यांचे नियम धाब्यावर बसवले गेले, याबद्दल न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली.मोठ्ठा दिलासा! देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या घसरली; बरे होणाऱ्यांची वाढली

निवडणूक प्रचारसभा सुरू असताना तुम्ही कोणत्या जगात होतात, असा संतप्त सवाल न्यायमूर्तींनी विचारला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी २ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीवेळी काय उपाययोजना करणार आहात, असा प्रश्नदेखील न्यायाधीशांनी उपस्थित केला. मतमोजणीवेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीची ब्लूप्रिंट सादर करा. अन्यथा २ मे रोजी होणारी मतमोजणी रोखू, असा गर्भित इशारादेखील त्यांनी दिला.'भारतातील परिस्थिती विदारक', कोरोना संकटावर WHO च्या प्रमुखांनी व्यक्त केली चिंता

देशातील जनतेच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवं आणि घटनात्मक संस्थांना याची आठवण करून द्यावी लागते ही बाब दुर्दैवी आहे. मतदान हा लोकांचा अधिकार आहे. तो त्यांना लोकशाहीनं दिला आहे. पण जनता जिवंत राहील, तेव्हाच त्यांना हा अधिकार बजावता येईल. सध्या बचाव आणि सुरक्षेलाच सर्वाधिक प्राधान्य आहे. बाकीच्या बाबी यानंतर येतात, असं न्यायमूर्ती म्हणाले. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१corona virusकोरोना वायरस बातम्या