शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

'जय श्रीराम' म्हणण्यास नकार दिल्यानं मारहाण; इमामाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 10:50 IST

प्रकरणाला धार्मिक वळण दिलं जात असल्याचा पोलिसांना संशय

बागपत: जय श्रीराम म्हणण्यास नकार दिल्यानं मारहाण झाल्याचा आरोप एका इमामानं केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी १० अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेचा व्हिडीओ पाहता, त्यामध्ये कुठेही 'जय श्रीराम' म्हणण्याची सक्ती झाल्याचं दिसत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. बागपतमधील मेरठ-कर्नाल महामार्गाजवळील सरोरा गावात हा प्रकार घडल्याचा दावा इमामानं केला. मेरठमधील सरधाना इथल्या मशिदीतील मुलांना शिकवून घरी परतत असताना १० तरुणांनी आपल्याला सरोरा गावाजवळ अडवल्याचं इमाम इम्लाकूर रेहमान अली यांनी पोलिसांनी सांगितलं. अली मुझफ्फरनगरच्या बुधानातील जोला गावचे रहिवासी आहेत. या प्रकरणी दोघाट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 'त्यांनी माझ्या डोक्यावरील टोपी काढली आणि दाढी धरुन जमिनीवर ढकललं. त्यांनी मला वारंवार जय श्रीराम म्हणण्यास सांगितलं. या रस्त्यानं पुन्हा गेलास तर खबरदार, अशी धमकीदेखील दिली. पुन्हा या भागात यायचं असेल तर दाढी कापून ये, असा इशारादेखील त्या १० जणांनी दिला', असा दावा अली यांनी केला.पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून घटनेचा व्हिडीओ पाहिला. त्यात कुठेही इमामाला जय श्रीराम बोलण्याची सक्ती केली जात नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. 'आम्ही इमामानं दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला. प्रथमदर्शनी हा संपूर्ण प्रकार जाणूनबुजून घडवण्यात आल्याचं दिसतं. कोणीतरी मुद्दामहून या प्रकरणाला धार्मिक वळण देत असल्याचा संशय वाटतो,' असं पोलीस उपअधीक्षक अनुज कुमार चौधरींनी सांगितलं. 

टॅग्स :Muslimमुस्लीम