शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आसाम, गुजरात, हिमाचल भूकंपाच्या धक्क्याने हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 02:10 IST

भूकंपाचा दुसरा धक्का दुपारी १.०९ वाजता पश्चिम आसाममध्ये कोकराझारमध्ये बसला. त्यामुळे मेघालयाचा पश्चिम भाग हादरला. यामुळे कसलीही हानी झाली नाही.

गुवाहाटी/अहमदाबाद : आसाम, गुजरात आणि हिमाचल प्रदेश गुरुवारी भूकंपाने हादरले. आसाममध्ये काही तासांच्या अंतराने भूकंपाचे दोन धक्के बसले व त्यामुळे शेजारच्या मेघालयचा काही भागही हादरला. त्यात कसलीही हानी झाली नाही. बराक खोऱ्यात गुरुवारी सकाळी ७.५७ वाजता करीमगंज येथे रिश्टर स्केलवर ४.१ तीव्रतेचा पहिला धक्का बसला. त्यामुळे मेघालयातील शिलाँग व गारो हिल्स भागही हादरला. भूकंपाचा दुसरा धक्का दुपारी १.०९ वाजता पश्चिम आसाममध्ये कोकराझारमध्ये बसला. त्यामुळे मेघालयाचा पश्चिम भाग हादरला. यामुळे कसलीही हानी झाली नाही.दरम्यान, हिमाचल प्रदेशातील उना भाग गुरुवारी पहाटे ४.४७ वाजता २.३ तीव्रतेच्या भूकंपाने हादरला. किन्नौर जिल्ह्यात मागील आठवड्यात ३.२ तीव्रतेचा भूकंप झाला होता.ईशान्य भारत भूकंपप्रवण असून, येथे वारंवार भूकंपाचे धक्के बसत आहेत. मागील एक महिन्यात मिझोराममध्ये भूकंपाचे अनेक धक्के जाणवले आहेत. त्यामुळे चम्फाई जिल्ह्यात नुकसानही झाले होते.राजकोट हादरले : नुकसान नाही- गुजरातच्या राजकोट शहराजवळील ग्रामीण भागाला गुरुवारी सकाळी ७.४० वाजता ४.८ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. यामुळे कसलेही नुकसान झाले नाही.- राजकोट शहरापासून दक्षिणेला २० किलोमीटर अंतरावर त्याचा केंद्रबिंदू होता. भूकंपानंतर मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी राजकोट, सुरेंद्रनगर व अमरेलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची माहिती गोळा करण्याचे, तसेच आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

टॅग्स :Earthquakeभूकंप