ईशान्य भारतामधील सर्वात मोठं राज्य असलेल्या आसाममध्ये पुढच्या काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहेत. निवडणुकीपूर्वी आसाममधील अंतिम मतदार यादीमधून सुमारे २ लाख ४३ हजार ४८५ नावं वगळण्यात आली आहेत. मसुदा मतदार यादीच्या तुलनेत अंतिम मतदार यादीमधून सुमारे ०.९७ टक्के मतदार कमी झाले आहेत. मतदार यादीतून नावं वगळण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये स्थलांतरीत झालेले मतदार, दुबार मतदार आणि नागरिकत्वाचा योग्य पुरावा देऊ न शकलेल्या मतदारांचा समावेश आहे.
आसाममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीमध्ये आता एकूण २ कोटी ४९ लाख ५८ हजार १३९ मतदारांचा समावेश आहे. त्यात १ कोटी २४ लाख, ८२ हजार २१३ पुरुष आणि १ कोटी २४ लाख ७५ हजार ५८३ महिला व ३४३ तृतीय पंथीयांचा समावेश आहे. आसाममधील विधानसभेचा कार्यकाळ हा २० मे २०२६ पर्यंत आहे. त्यामुळे आसाममध्ये एप्रिल आणि मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत निवडणुका होण्याची शक्यता आहे.
आसाममध्ये नागरिकत्व निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी येथे मतदार याद्यांचं विशेष पुनरीक्षण (SIR) करण्यात आलेलं नाही. त्याऐवजी सर्वसाधारण पूनरीक्षण करण्यात आलं आहे. आसाममध्ये मतदार याद्यांचं व्यापक पुनरीक्षण हे पुढच्या काळात होणार आहे.
दरम्यान, मतदार यादीतून नाव हटवण्यात आलेले मतदार मतदार नोंदणी अधिकाऱ्याच्या कुठल्याही निर्णयाविरोधात १५ दिवसांच्या आत जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे दाद मागू शकतात. त्यानंतर ३० दिवसांच्या आत मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे दुसरं अपील करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
Web Summary : Ahead of Assam's assembly elections, over 2.43 lakh names were removed from the final voter list. These include migrated voters, duplicate entries, and those lacking citizenship proof. The list now has 2.49 crore voters. A comprehensive revision will be done later.
Web Summary : असम विधानसभा चुनाव से पहले, अंतिम मतदाता सूची से 2.43 लाख से अधिक नाम हटाए गए। इनमें स्थानांतरित मतदाता, दोहरी प्रविष्टियां और नागरिकता प्रमाण के अभाव वाले शामिल हैं। अब सूची में 2.49 करोड़ मतदाता हैं। व्यापक संशोधन बाद में किया जाएगा।