शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट चकमक प्रकरणात मेजर जनरलसह 6 जणांना आजन्म तुरुंगवास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 07:31 IST

24 वर्ष जुन्या बनावट चकमक प्रकरणात लष्करी न्यायालयानं सुनावली शिक्षा

नवी दिल्ली: आसाममध्ये 24 वर्षांपूर्वी झालेल्या एका बनावट चकमक प्रकरणात लष्कराच्या न्यायालयानं मेजर जनरलसह 6 जणांना दोषी ठरवलं आहे. 1994 मध्ये आसाममध्ये झालेल्या बनावट चकमकीत 5 तरुणांना जीव गमवावा लागला होता. या प्रकरणात लष्करी न्यायालयानं दोषींना आजन्म तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यात 1994 मध्ये बनावट चकमक झाली होती. त्या प्रकरणात 7 जण दोषी आढळले आहेत. यामध्ये मेजर जनरल ए. के. लाल, कर्नल थॉमस मॅथ्यू, कर्नल आर. एस. सिबिरेन, ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्स आणि नॉन कमिशन्ड ऑफिसर्स दिलीप सिंह, जगदेव सिंह, अलबिंदर सिंह आणि शिवेंदर सिंह यांचा समावेश आहे. लष्करी न्यायालयानं दोषी ठरवलेले हे सर्व अधिकारी या निकालाविरोधात आर्म्ड फोर्सेस ट्रिब्युनल आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात. 1994 मध्ये एका अधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणात 18 फेब्रुवारी 1994 मध्ये तिनसुकिया जिल्ह्याच्या विविध भागांमधून लष्कराच्या जवानांनी नऊ जणांना ताब्यात घेतलं होतं. यातील पाच जणांना बनावट चकमकीत ठार करण्यात आलं. हे पाच जण उल्फा (युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम) संघटनेचे सदस्य असल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. तर ताब्यात घेण्यात आलेल्या चार जणांना सोडून देण्यात आलं होतं, अशी माहिती आसाम सरकारमध्ये मंत्री असलेले भाजपा नेते जगदिश भुयान यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. जगदिश भुयान यांनी 1994 मध्ये या प्रकरणात गुवाहाटी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर उच्च न्यायालयानं लष्कराला ऑल इंडिया स्टुडंट युनियनच्या 9 बेपत्ता कार्यकर्त्यांना जवळच्या पोलीस ठाण्यात हजर करण्याच्या सूचना केल्या. यानंतर लष्करानं लष्करानं पाच जणांचे मृतदेह तिनसुकियाच्या ढोला पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणात 16 जुलैला कोर्ट मार्शलची प्रक्रिया सुरू झाली. 27 जुलैला या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान